तरुण भारत

नगराध्यक्षांनी रूग्णालयातुन घेतला शहराचा आढावा

वार्ताहर/ कराड

  कराडच्या नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांना कारोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांनी जिल्हाअधिकारी व प्रांतअधिकारी यांच्याशी फोनवरून याबाबत चर्चा केली. तसेच मुख्याधिकारी रमाकांत डाके व प्रशासकीय अधिकाऱयांशी फोनवर संपर्क साधुन आढावा घेतला. दरम्यान शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरीकांनी काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केली केले आहे.

Advertisements

   कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासुन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे शहराच्या सुरक्षिततेसाठी ऑनफिल्ड आहेत. मात्र त्यांनाच कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना  उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांचे पती उमेश शिंदे यांनी सांगीतले आहे. 

  दरम्यान कराड शहरात कोरोना बाधितांची संगया वाढत असताना रोहिणी शिंदे यांनी जिल्हाअधिकारी व प्रांतअधिकारी यांसोबत फोन वरून सविस्तर चर्चा केली.तसेच मुख्याधिकारी व पालिकेतील अधिकऱयांशी फोन वरूनसंपर्क साधुन सातत शहराच्या परीस्थीतीतीचा आढावा घेत आहेत. लवकरच कोरोना मुक्त होवुन पुन्हा शहरवासीयांच्या सेवेत हजर रहाण्याचा विश्वास रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शहरात रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरीकांनी स्वताची व कुटुंबाची काळजी घ्यावी व प्रशासनांच्या सुचनांचे पालन करून प्रशासनास मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

           डॉ.सुरेश भोसले यांनी दिला धिर

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे समजताच  कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी धिर देत संपुर्ण कृष्णा परिवार आपल्या सोबत आहे. तसेच कराडकर जनतेच्या शुभेच्छा आपल्या सोबत असल्याचे सांगीतले तसेच त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या उपचाराबाबत स्वता डॉ.सुरेश भोसले माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणूक आचारसंहितेचे पालन करा – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलीस सज्ज

Patil_p

नाना पटोले यांच्या ‘त्या’ विधानावर बाळासाहेब थोरत म्हणाले …

Abhijeet Shinde

प्रेम प्रकरणावरुन तरुणाच्या घरावर हल्ला

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात 11 जणांना डिस्चार्ज तर 181 जणांचे रिपोर्ट पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

सातारा : तारळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!