तरुण भारत

हेमंत निंबाळकर यांचा कोरोना जागृतीचा व्हिडीओ व्हायरल

प्रतिनिधी/ बेळगाव

आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या आवाजातील कोरोना विषयी जागृतीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जागृतीसाठी त्यांनी समाज माध्यमांचा प्रभावी वापर केला असून कार्टुनच्या माध्यमातील व्हिडीओला संभाषणही त्यांनी स्वतः लिहिले आहे.

यापूर्वी बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून प्रभावीपणे सेवा बजाविणारे हेमंत निंबाळकर सध्या बेंगळूर येथे महत्वाच्या पदावर आहेत. कोरोना महामारी विरुध्द संपूर्ण जग लढते आहे. अशापरिस्थितीत वेगवेगळय़ा माध्यमातून जागृतीचीही गरज आहे. ही गरज ओळखून त्यांनी कार्टुनच्या व्हिडीओला अत्यंत प्रभावीपणे आपला आवाज दिला आहे.

या व्हिडीओसाठी संवादही त्यांनी स्वतः लिहिले आहे. समाज माध्यमांवर सध्या 1 मिनीटे 19 सेकंदचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यासंबंधी तरुण भारतचे हेमंत निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता कार्टुन हा एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून पटकण लक्ष वेधून घेता येते.

आपल्याला नेमके काय सांगायचे आहे? ते व्यवस्थीतपणे साध्या व सोप्या भाषेत सांगता येते म्हणून आपण हे माध्यम निवडल्याचे त्यांनी सांगितले. संवाद लिहून त्याला आवाजही त्यांनी स्वतः दिला आहे. हा व्हिडीओ लक्षवेधी ठरत आहे. समाज माध्यमात या व्हिडीओला नागरिकांची चंगली पसंतीही मिळत आहे.

Related Stories

आविष्कार महिला उद्यमशील संस्थेचा आज वर्धापन दिन

Amit Kulkarni

भारत विकास परिषदेतर्फे सामूहिक वंदे मातरम् गीत

Amit Kulkarni

तरुणाच्या बँक खात्यातील रक्कम हडपली

Rohan_P

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी मनपाकडून आवश्यक उपाययोजना

Patil_p

रांगोळीचे भारतीय संस्कृती-कलेशी दृढ नाते!

Patil_p

कॅन्टोन्मेंटच्या गाळय़ाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला

Patil_p
error: Content is protected !!