तरुण भारत

कितीही विरोध झाला तरी, राम मंदिराचे निर्माण होणारच

प्रतिनिधी/ बेळगाव

राम मंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या राममंदिराला कितीही विरोध झाला तरी त्याचे निर्माण हे होणारच. यापूर्वीही श्रीराम जन्मभूमिवर आक्रमणे झाली आहेत. हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या राम मंदिराच्या निर्मितीतून संस्कृतीचा पाया अधिक भक्कम होईल, असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमि तिर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी केले.

Advertisements

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राम मंदिराच्या निर्माणाला आता विरोध का? या विषयावरील ऑनलाईन परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादामध्ये अयोध्या येथील महंत पवनकुमार दास शास्त्री, राष्ट्रीय मार्गदर्शक चारूदत्त पिंपळे, विष्णुशंकर जैन, रमेश शिंदे सहभागी झाले होते. सतिश कोचरेकर व सुनील सागवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले..

Related Stories

श्रावण शुक्रवारनिमित्त मंदिरांमध्ये महिलांची गर्दी

Amit Kulkarni

स्मार्टक्लासला जि.पं.मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची भेट

Patil_p

50 वर्षांपूर्वीच्या मित्रांनी दिला आठवणींना उजाळा

Omkar B

हिंडाल्कोच्यावतीने औषधे-मास्कचे वाटप

Amit Kulkarni

चव्हाट गल्ली येथे पावसामुळे घर कोसळून मोठे नुकसान

Amit Kulkarni

शांतीसागर मुनींच्या स्मारकाचे लोकार्पण

Amit Kulkarni
error: Content is protected !!