तरुण भारत

रानडुकराच्या हल्ल्यात एकटा ठार

आडे – रिवण येथे बागायतीत काम करताना घटना

वार्ताहर / केपे

आडे-रिवण येथील बागायतीत काम करत असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याने संतोष नाईक (वय 53 वर्षे) याला जागीच मृत्यू आला. पावसाळा सुरू होताच बहुतेक बागायतींत माडाला ‘आळी’ काढण्याचे काम सुरु होते. आडे-रिवण येथील एकाच्या बागायतीत आळी काढण्याचे काम संतोष, त्याची पत्नी व काही कामगार करत होते. सर्व जण कामात मग्न असताना दुपारी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3 च्या दरम्यान एक रानडुक्कर तेथून धावून गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर सर्व जण आपल्या कामात मग्न असताना अचानक तेथे काम करणाऱया संतोष नाईक याला सदर रानडुकराने समोरून धडक दिली व तो पसार झाला. या धडकेमुळे नाईक हा जमिनीवर कोसळला व बाकीचे धावून येईपर्यंत काही क्षणांतच त्याला मृत्यू आला. संतोष जेथे काम करत होता तेथे जवळच आणखी काही जण होते तसेच त्याची पत्नीही जवळच होती. तो पंडेसडो-रिवण येथील रहिवासी असून या घटनेची माहिती मिळताच केपे पोलीस घटनास्थळी पोहोचले. यासंबंधी केपेचे पोलीस निरीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले की, पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेकरिता हॉस्पिसियोत पाठविण्यात आला आहे. शवचिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला जाईल.

Related Stories

राज्य विधानसभेचे अधिवेशन आज

Patil_p

वाळपई नगरपालिकेसाठी एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल

Amit Kulkarni

लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी हरमल शाखेतर्फे शिक्षकांचा सत्कार

Amit Kulkarni

दहावी-बारावी परीक्षा लॉकडाऊन संपल्यानंतर

Omkar B

विकासाच्या प्रकल्पांपेक्षा आरोग्य सुविधांवर जादा खर्च करा

Omkar B

गोवा बागायतदारकडून सतराशे टन काजू खरेदी

Omkar B
error: Content is protected !!