तरुण भारत

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांना कोरोनाची लागण झाली आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Advertisements

रॉबर्ट यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांनी स्वतःला विलगिकरणात ठेवले आहे. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तेथूनच ते आपले काम करत आहेत.ट्रम्प आणि रॉबर्ट 10 जुलैला एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांची भेट कधी झाली, याची माहिती समजू शकले नाही. मात्र, राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यांच्या संपर्कात रॉबर्ट आले नसल्याचे सांगण्यात येते. 

यापूर्वी ट्रम्प यांच्या खासगी सचिवाला आणि उपराष्ट्राध्यक्षांच्या प्रेस सेक्रेटरीला कोरोनाची लागण झाली होती. 

Related Stories

”मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?”

Abhijeet Shinde

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात आतापर्यंत 15,294 पोलिसांना बाधा

Rohan_P

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे तीन बळी, 177 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

चिंताजनक : महाराष्ट्रात आतापर्यंत ‘ब्लॅक फंगस’चे 5,763 रुग्ण

Rohan_P

झगडणाऱ्या पंजाब किंग्ससमोर आज मुंबई इंडियन्सचे आव्हान

Amit Kulkarni

अंतराळक्षेत्राकरिता खासगी प्रस्तावांचा प्रतिसाद

Omkar B
error: Content is protected !!