तरुण भारत

…म्हणून अमिताभ बच्चन यांना आंनदाश्रू झाले अनावर

ऑनलाईन टीम / मुंबई : 


अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती स्वतः अभिषेक बच्चन याने ट्विट करुन दिली होती. 

Advertisements


त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी यांनी देखील एक ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, आमच्या चिमुकलीला आणि सूनबाईंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नाही आहेत. देवा तुझी कृपा आहे, अशा भावना व्यक्त केल्या. 


दरम्यान, आराध्या आणि ऐश्वर्या या दोघींवर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू होते. या दोघींना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, अभिषेक आणि अमिताभ बच्चन हे दोघे अजूनही रुग्णालयातच असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

Related Stories

पौराणिक मालिकांवर कलर्सचा भर

Patil_p

ताराचा ‘तडप’ 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार

Patil_p

नियतीने पुन्हा आणलं

Patil_p

गोष्ट एका पैठणीचीसाठी सायली रमली डबिंगमध्ये

Patil_p

लॉकडाऊनमध्ये वाचन सुरु आहे : गिरीश ओक

Patil_p

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!