तरुण भारत

सांगली : कडेपूरातील ऐतिहासिक शिवकालिन विहिरीचे रुपडेच बदलले

शासनाचा सहभाग व संग्रामसिंह देशमुख यांची दूरदृष्टी

हिराजी देशमुख / कडेगाव

कडेपूर ता. कडेगाव येथील शेकडो वर्षापूर्वीची शिवकालीन विहीर आजच्या काळात एक ऐतिहासिक व शिवकालिन ठेवा असलेली विहीर म्हणून कडेपूरवासीय संबोधत आहेत. एके काळी संपूर्ण कडेपूर गावची पिण्याची तहान ही विहीर भागवत होती व आजही भागवत आहे.

Advertisements

कडेपूर गावातील हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा अशी जेष्ठ लोकांची अनेक दिवसांपासूनची मनोकामना होती. ही विहरीतील गाळ काढून पडझड झालेल्या भागातील दगडांनीच पुन्हा बांधकाम करून पूर्वीसारखे त्याचे स्वरूप दिसावे मात्र खर्चही मोठा होता. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख(बाबा) आणि सांगली जिल्हा परीषदेचे माजी जि. प. अध्यक्ष संग्राम देशमुख (भाऊ) यांनी शासनाच्या पाठबळावरच हे काम आता पूर्ण झाले आहे. शासन अशा जुन्या व ऐतिहासिक विविध प्रकारच्या बांधकामांचे संवर्धन करण्यासाठी विविध योजना राबवत असते. अशा नाविन्यपूर्ण योजनेतून या विहरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख (भाऊ) यांच्या स्वयनिधीमधून या ऐतिहासिक विहिरीचे दगडी बांधकाम व गाळ काढनेचे काम अलीकडच्या काही दिवसात पूर्ण झाले आहे. या विहिरीतून होत असलेला स्वच्छ पाणी पुरवठा एक प्रकारे कडेपूरकरांचा व तालुक्यातील लोकांचा चर्चेचाच भाग बनलेला आहे. तालुक्यातील ही विहिर पाहण्यासाठी लोक आर्वजून भेट देत आहेत.

पाणी हा मानवी जीवनाचा मूलभूत घटक आहे. पाणी नसेल तर संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल. आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे अपार महत्व आहे. शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते. आपण निरोगीराहण्यासाठी पाणी तर लागतेच; पण ते स्वच्छ, शुद्ध आणि रोगजंतूविरहित असावे लागते.

पिण्याच्या पाण्यामधून अनेक प्रकाराचे विषाणू, जीवाणू, रोगजंतू, जंत आणि विषारी पदार्थ शरीरात जाऊन आपले आरोग्य बिघडवू शकतात. त्यामुळे पाणी शुद्ध करून पिणे जरुरी असते. याची जाणीव सदैव देशमुख कुटुंबाला आहे. त्यामुळेच कोठेही पाणी हा विषय पुढे आला कि देशमुख कुटुंबिय नेहमीच अग्रेसर असते. याच जाणिवेतून कडेपूर मधील ऐतिहासिक विहिरीचे काम पूर्ण झालेले आपण पाहत आहोत. एकंदरीत कडेपूर येथील शिवकालीन अशा ऐतिहासिक विहरीचे रूपडे पालटलेले आहे.आणि हि विहिरीचे पालटलेले रूपडे पाहण्यासाठी तालुक्यातील लोक येत आहेत.

Related Stories

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकुशल दिव्यांगांना रोजगार हमीचा लाभ

Abhijeet Shinde

कोकरूड पोलिसांची घेतली कायदेविषयक परीक्षा

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात मागील 24 तासात 985 कोरोनाचे बळी

Rohan_P

एनडीआरएफची टीम कोल्हापुरात दाखल होणार

Abhijeet Shinde

सांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Abhijeet Shinde

पुणे शहरात आज 282 नवे कोरोना रूग्ण, 112 डिस्चार्ज!

Rohan_P
error: Content is protected !!