तरुण भारत

‘कोरोना कवच’ आरोग्य विमा पॉलिसी उतरविताना

कोरोनामुळे हॉस्पिटलात भरती व्हावे लागल्यास हॉस्पिटलचा खर्च फार मोठा होतो व सध्या जी कोरोनासाठी नवी ‘कोरोना कवच’ पॉलिसी कार्यरत झाली आहे, तिच्यातून रुग्णाला किती मदत मिळेल? व दावे संमत करण्याचे नक्की नियम काय असतील याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. सरकारने कोरोनाच्या उपचारासाठी अधिकृत पद्धती जाहीर केली आहे. त्या उपचार पद्धतीवर खर्च केलेली रक्कमच संमत होणार. डॉक्टरांनी जर आंतरराष्ट्रीय मान्य असलेली उपचार पद्धती रुग्णाला दिली व ही उपचार पद्धती सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे मान्यता प्राप्त नसेल तर रुग्णाचा या उपचार पद्धतीचा दावा नामंजूर होण्याचीही शक्मयता आहे. प्लाझ्मा उपचार पद्धतीस सरकारने अजून अधिकृतता दिलेली नाही. सरकारच्या दाव्याप्रमाणे या पद्धतीच्या चाचण्या चालू आहेत. यामुळे विमा कंपन्या प्लाझ्मा उपचार पद्धतीचा खर्च नामंजूर करण्याचीही शक्मयता आहे.

ठराविक कंपन्यांनी ही पॉलिसी ऑनलाईन खरेदी करण्याची सुविधा ग्राहकांना दिली आहे. बऱयाच विमा कंपन्यांच्या ही पॉलिसी खरेदी करण्याचा फॉर्म त्यांच्या ‘वेबसाईट’वर असून तो भरून द्यायचा असतो. काही मोठय़ा खासगी विमा कंपन्यांनी हा फॉर्म आपल्या वेबसाईटवर ठेवलेलाच नाही. सरकारी कंपन्यांच्या वेबसाईटवर मात्र हा फॉर्म आहे. ही पॉलिसी 65 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी उपलब्ध असल्यामुळे याहून अधिक बऱयाच नागरिकांना हे विमा संरक्षण मिळू शकत नाही. ही पॉलिसी काढताना अर्जदाराला अगोदरचे काही आजार असतील तर काय? याबाबतचे योग्य स्पष्टीकरण या पॉलिसीत नाही. एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी अगोदरपासूनचा आजार असणाऱयांना या विम्याचे संरक्षण देते तर फ्युचर जेनेरली इंडिया इन्शुरन्स कंपनी अशांना जास्त प्रिमियम आकारते. याबाबत स्पष्ट नियम नसल्यामुळे प्रत्येक कंपनीने स्वतःचे नियम तयार केलेले आहेत. तुमची जर मेडिक्लेम पॉलिसी असेल तर फक्त कोरोनासाठी असलेली ही दुसरी पॉलिसी घ्यावी का? हा प्रश्न बहुतेकांना सतावतो. जर तुमची मेडिकल पॉलिसी 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची असेल तर तुम्ही ‘कोरोना कवच’ घेतली नाही तरी चालेल. याबाबतचा निर्णय प्रत्येकाने सारासार विचार करून घ्यावा. जर मेडिक्लेम फक्त 1 किंवा 2 लाख रुपयांचा तसेच 5 लाख रुपयांहून कमी असेल तर अशांनी ही पॉलिसी अवश्य घ्यावी.

सध्याच्या मेडिक्लेम पॉलिसीधारकांकडे तीन पर्याय उपलब्ध आहेत. एक विमा संरक्षणाची रक्कम वाढवून घेणे. समजा, ती 2 लाख रुपये आहे तर ती 10 लाख रुपये करणे किंवा टॉपअप करणे. टॉपअपसाठी खर्च कमी येतो व तिसरे कोरोना कवच विकत घेणे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला पुरेशा रकमेचे विमा संरक्षण हवे. तुम्ही कोरोना कवच पॉलिसी तुमच्या नेहमीच्या पॉलिसी व्यतिरिक्तही घेऊ शकता. पॉलिसींवर भरलेल्या प्रिमियमवर प्राप्तीकर सवलतही मिळते. हे टॉपिंगही उपलब्ध आहे. दोन्ही पॉलिसी एकाच कंपनीच्या असतील तरच तुम्हाला कॅशलेस सुविधेचा फायदा मिळणार. दोन पॉलिसी वेगवेगळय़ा कंपनीच्या असतील तर एका कंपनीकडूनच कॅशलेस सुविधा मिळणार. टॉपअप पॉलिसी आणि मूळ पॉलिसीही एकाच कंपनीची हवी नाही तर दोन्ही पॉलिसींवर कॅशलेस सेवा मिळणार नाही.

कोरोना भयंकर रोग आहे. पैशामुळे उपचार होऊ शकले नाहीत ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून ज्या कंपनीची पॉलिसी योग्य वाटेल त्या कंपनीची घ्यावी. सर्व कंपन्यांच्या पॉलिसींचा अभ्यास करून तुम्हाला जी योग्य वाटते ती घ्यावी. इतर दावे संमत करताना त्रास देणाऱया विमा कंपन्या, कोरोनाचा दावा संमत करताना उदारमतवादी धोरण अंगिकारत आहेत, हे निश्चित.

Related Stories

सात महिन्यानंतर निर्यातीत वाढ

Patil_p

फेब्रुवारीमध्ये सेवा क्षेत्रात तेजी

Patil_p

कोविडच्या लढय़ासाठी कोका-कोला इंडियाचे 100 कोटांचे सहाय्य

Patil_p

टेस्लाचा एस अँड पी मध्ये लवकरच समावेश

Patil_p

कोरोना कालावधीत प्रथमच जीएसटी संकलन तेजीत

Patil_p

तिसऱया दिवशी सेन्सेक्स 163 अंकांनी वधारला

Omkar B
error: Content is protected !!