तरुण भारत

खनिज तेलाची आयात जूनमध्ये सर्वाधिक कमी

नवी दिल्ली : भारताची खनिज तेल आयात जूनमध्ये मागील नऊ वर्षात सर्वाधिक कमी राहिली आहे. जून 2009 नंतर प्रथमच व्हेनेएझुलामधून तेल आयात करण्यात आली नाही. रिफायनरीची देखभाल आणि अन्य कारणामुळे इंधनाची मागणी कमी राहिल्याच्या कारणामुळे खरेदीवर मोठय़ा प्रमाणात अंकुश लागल्याची माहिती आहे. पहिल्या सहामाहीत देशात काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे इंधनाची मागणी कमी प्रमाणात राहिली आहे. सदरची परिस्थिती ऑक्टोबर 2011 नंतर म्हणजे जवळपास 9 वर्षाच्या कालावधीनंतर निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले आहे. जगातील तिसरा सर्वाधिक मोठा तेल ग्राहक आणि आयातदार म्हणून भारताला ओळखले जात आहे. जूनमध्ये प्रतिदिन 3.2 दशलक्ष बॅरेल तेल प्राप्त करण्यात आले आहे. मे महिन्याच्या तुलनेत 0.4 टक्के आणि एक वर्षाच्या अगोदरच्या तुलनेमध्ये जवळपास 28.5 टक्क्मयांची घसरण राहिली होती. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसह देशातील टॉपच्या रिफायनरी, रिलायन्स इंडस्ट्रीज, जगातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असून पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या देखभालीची युनिटही बंद योजना बनवली आहे.

Related Stories

जिओ-फेसबुक डिजिटल क्रांतीसाठी एकत्र

Patil_p

सांझ ढले…

Omkar B

दुसऱया दिवशी सेन्सेक्सची 52 अंकांनी घसरण

Patil_p

रेडमी 9 ए भारतात दाखल

Patil_p

रॉयल इनफिल्डचा महिला बाईकस्वारांसाठी पेहराव

Patil_p

पोलादाच्या वाढत्या किमतीवर मिळवणार नियंत्रण

Patil_p
error: Content is protected !!