तरुण भारत

कोल्हापूर : कोरोना रुग्णावर घरीच उपचार, पहिला पथदर्शी प्रकल्प वडणगेत

सरपंच सचिन चौगले यांची पत्रकार बैठकीत माहिती

वार्ताहर/प्रयाग चिखली

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णावर त्याच्या घरातच अलगीकरण करून उपचार करायला जिल्हा प्रशासनाने मंजूरी दिली आहे. राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच पथदर्शी प्रकल्प राबवण्याचा निर्णय वडणगे ता. करवीर येथील ग्रामपंचायतीने घेतला होता. प्रशासनाने हा आता प्रकल्प संपूर्ण जिल्हयात राबवण्यास मंजुरी दिली असून याबाबतची नियमावली जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाने जारी केली आहे अशी माहिती सरपंच सचिन चौगले व कोरोना दक्षता समितीने पत्रकार बैठकीत दिली.

कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्‍या रूग्णाला त्याच्या घरीच अलगीकरणात ठेवून उपचार करण्याची संकल्पना प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी मांडली होती. याबाबतचा प्रस्ताव तयार करून पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने याला तात्काळ मंजुरी दिली. त्यानंतर जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबतची नियमावली जाहीर केली. गृह अलगीकरणाचा राबवण्यात येणारा राज्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प असल्याची माहिती सरपंच चौगले यांनी दिली

प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, प्रशासकीय मंजुरीनंतर आता स्थानिक दक्षता समितीची जबाबदारी वाढली आहे . रूग्णाला गावातच सुलभ व वेळेत उपचार मिळणार आहेत. शिवाय घरी व गावातच असल्याचा मानसिक आधारही मिळेल. ग्रामस्थांची खंबीर साथ घेवून हा पॅटर्न यशस्वी करून राज्यात आदर्श निर्माण करू.

डॉ संदीप पाटील म्हणाले, वैदयकीय अधिकार्‍यांच्या सल्लयानुसार कोणत्या रूग्णाला गृह अलगीकरणात ठेवले जाणार हे निश्‍चित केले जाईल. संबंधित रूग्णाला कोणती औषध द्यायची ,डायट प्लॅन याबाबत स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने व्हीसीव्दारे माहिती दिली जाणार आहे.

पत्रकार बैठकीला उपसरपंच सतिश पाटील, वडणगे सेवा संस्थेचे सभापती जालिंदर अस्वले, बाजीराव पाटील ,पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पाटील,ग्रामसेवक प्रकाश बागुल यांच्यासह ग्रा.पं सदस्य शासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये ४९ कोरोनाबाधितांची भर

triratna

खाटांगळेत रेशन धान्य वाटपात भ्रष्टाचार

triratna

मंत्री बाळासाहेब पाटील मुंबईमध्ये दाखल

Patil_p

कोल्हापूर : कबनूरात कोरोना बाधितांचे अर्धशतक पार

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 5 मृत्यू

triratna

मनी लॉड्रिंग प्रकरण : अनिल देशमुखांकडून गंभीर आरोप

triratna
error: Content is protected !!