तरुण भारत

सांगली : सात जणांचा बळी, नवे 139 रूग्ण

महापालिका क्षेत्रात  116 रूग्णः ग्रामीण भागात 23 रूग्णः जिल्हा बँकेतील दोन कर्मचारी बाधितः स्टेट बँकेतील अधिकारी बाधित

प्रतिनिधी/सांगली

Advertisements

मंगळवारी जिल्हय़ात नवे 139 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात 116 तर ग्रामीण भागात 23 रूग्ण वाढले आहेत. एकूण रूग्णसंख्या 1898 झाली आहे. 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत जिल्हय़ात कोरोनाने बळी गेल्याची संख्या 64 झाली आहे.

सांगली शहरात 62 रूग्ण वाढले

सांगली शहरात मोठय़ाप्रमाणात रॅपीड ऍण्टीजन टेस्ट घेण्यात येत चालल्या आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत चालली आहे. सांगली शहरात या टेस्टमध्ये 30 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. जामवाडी आरोग्य केंद्रात पाच जण पॉझिटिव्ह आले. साखर कारखाना नागरी केंद्रात पाच जण हनुमाननगर नागरी केंद्रात 19 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. विश्रामबाग नागरी केंद्रात एक जण पॉझिटिव्ह आला आहे. तर स्वॅब तपासणीमध्ये एकूण 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये जामवाडी भागातील गवळी गल्ली येथील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. गणेशनगर मधील एक  वानलेसवाडी मधील एक एस.टी. स्टँड रोडवरील मातृभूमी क्रीडा मंडळाजवळील दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर लाले प्लॉटमधील एक व्यक्ती बाधित आढळली आहे. खणभागामधील नगरसेवकाचा भाऊ पॉझिटिव्ह आला आहे. तर खणभागामधीलच एका माजी महापौरांना थोडा त्रास होत असल्याने त्यांना मिरजेच्या मिशन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांचाही स्वॅब घेण्यात आला आहे. पण त्याचा अहवाल अद्यापही आला नाही.

मिरजेतही 54 रूग्ण वाढले

मिरजेतही मंगळवारी मोठयाप्रमाणात रूग्ण वाढले आहेत. एकूण 54 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये 24 रूग्ण हे ऍण्टीजन टेस्टमध्ये वाढले आहेत. मिरज शहरात ही मोठयाप्रमाणात टेस्ट घेण्यात आली त्यामध्ये हे 24 रूग्ण आढळून आले आहेत. तसेच स्वॅब तपासणीमध्ये 30 रूग्ण वाढले आहेत. यात मंगल चित्रपटगृहा जवळील दहा जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी दहाजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने मिरजेत खळबळ माजली आहे. तसेच ईदगाह नागरी केंद्रावर 16 जण पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ माजली.

ग्रामीण भागात 23 रूग्ण वाढले

वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्याठिकाणी दोन नवे रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे दोन आणि आटपाडी तालुक्यातील आवळाई येथे ही दोन रूग्ण वाढले आहेत. आटपाडी,खरसुंडी, समडोळी, अंकली,भोसे, हरीपूर,माडग्याळ, कवठेमहांकाळ, कुची, कडेगाव, तासगाव, कुंडल, कोकरूड,  रोजावाडी, ऐतवडे खुर्द  येथे प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे.

उपचारादरम्यान सात जणांचा  मृत्यू

मिरज तालुक्यातील हरीपूर येथील 54 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचे उपचार सुरू असताना कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील खटाव येथील 65 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कवठेमहांकाळ येथील 55 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिरज येथील 51 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे तर मिरज  येथील 37 वर्षीय व्यक्ती आणि 75 वर्षीय महिला यांचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  तर मिरज येथील 68 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात एकूण 64 बळी गेले आहेत.

 27 जण कोरोनामुक्त

 जिल्हय़ातील मंगळवारी उपचार सुरू असणारे  27 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्च देण्यात आला आहे. त्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उपचार सुरू असणाऱया 24 जणांच्यावर मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

बँक कर्मचारी, व्यापारी आणि नगरसेवकाचा भाऊ बाधित

जिल्हा बँकेतील आणखीन दोन कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शहरातील स्टेट बँकेच्या गणपती पेठ शाखेतील एका अधिकाऱयास कोरोनाची लागण झाली आहे. मार्केट यार्डातील तीन व्यापारी बाधित आढळून आले आहेत. तर खणभागामधील एका नगरसेवकाचा भाऊ बाधित झाला आहे. खणभागामधील माजी नगरसेवकांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना मिरजेच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यांचाही स्वॅब घेण्यात आला आहे. पण त्याचा अहवाल अद्यापही आला नाही.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती

एकूण रूग्ण   1898

बरे झालेले     910

उपचारात      924

मयत         64

Related Stories

राज्य शासनाने चांदी उद्योग चालू करण्यास सवलत द्यावी

Abhijeet Shinde

साताऱयात भररस्त्यात 150 जणांची कोरोना चाचणी

Patil_p

सांगली : कोरोना बाहयरुग्णांची माहिती लपवल्यास डॉक्टरांवर कारवाई

Abhijeet Shinde

सांगली : शेतकऱ्यांना तातडीने १० हजारांचे अनुदान द्या : धनंजय देशमुख

Abhijeet Shinde

हा विजय कार्यकर्ते, मतदारांना समर्पित : जयंत पाटील

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यासाठी 74 व्हेंटिलेटर प्राप्त – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!