तरुण भारत

निवडणूकपूर्व सर्वेक्षणात ज्यो बिडेन आघाडीवर

डोनाल्ड ट्रम्प यांची होतेय पिछेहाट

वॉशिंग्टन :

Advertisements

अमेरिकेत कोरोना संकट कायम असताना देखील अध्यक्षीय निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. अध्यक्षीय निवडणुकीसंबंधी आणखी एका सर्वेक्षणात डेमोक्रेटिक उमेदवार ज्यो बिडेन यांनी 10 अंकांची आघाडी घेतली आहे. अमेरिकेचे नेतृत्व करण्यासाठी बिडेन योग्य असल्याचे बहुतांश नागरिकांनी म्हटले आहे. अमेरिकेत रिपब्लिकन पार्टीतर्फे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा रिंगणात असून त्यांना बिडेन यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.

हिल न्यूज संकेतस्थळाने हार्वर्ड कॅप्स-हॅरिस सर्वेक्षणाचा दाखला देत 55 टक्के नागरिकांनी बिडेन यांना पाठिंबा दर्शविल्याचे म्हटले आहे. तर अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत केवळ 45 टक्के मतदार आहेत. डेमोक्रेटक समर्थकांपैकी 91 टक्के जण बिडेन यांच्यासोबत आहेत. तर रिपब्लिकन मतदारांपैकी 87 टक्के जण ट्रम्प यांचा कार्यकाळ उत्तम राहिल्याचे मानतात.

प्रेसिडेन्शियल डिबेट

अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी होणाऱया अध्यक्षीय निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रेसिडेन्शियल डिबेटच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. कमिशन ऑन प्रेसिडेन्शियल डिबेटकडून जाहीर कार्यक्रमानुसार ट्रम्प आणि बिडेन यांच्यातील पहिला अध्यक्षीय उमेदवार वादविवाद 29 सप्टेंबर रोजी ओहियोच्या क्लीवलँड येथे आयोजित होणार आहे.

दुसरा अध्यक्षीय उमेदवार वादविवाद 15 ऑक्टोबर रोजी फ्लोरिडाच्या मियामी तर तिसरा वादविवाद 22 ऑक्टोबर रोजी टेनेसीमध्ये होणार आहे. उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये होणारा वादविवाद 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सर्व वादविवाद 90 मिनिटे चालणार आहे. व्हाइट हाउस पूल नेटवर्क कुठल्याही जाहिरातीशिवाय याचे थेट प्रसारण करणार आहे.

कोरोना संकटामुळे ट्रम्प अडचणीत

कोरोना संसर्गादरम्यान टाळेबंदी लागू करण्यास विलंब, कृष्णवर्णीयांवर होत असलेले अत्याचार यासारख्या मुद्दय़ांवर बिडेन यांनी भर दिला आहे. तर कोरोना संसर्ग रोखण्यास योग्यवेळी पावले उचलण्यास ट्रम्प यांनी विलंब केल्याचे मत अनेक जण व्यक्त करत आहेत.

Related Stories

बांगलादेशचा चीनला झटका

Patil_p

‘कोरोना’काळातही अमेरिकेत श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ

Patil_p

अरुणाचल सीमेजवळच्या रेल्वेमार्गाचे काम सुरूच ठेवा : जिनपिंग

datta jadhav

कोरोना संपल्याच्या भ्रमात वावरू नका!

Patil_p

इंडोनेशियातील बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले; प्रवाशांचा शोध सुरू

datta jadhav

एड्सवर औषध सापडल्याचा ब्राझीलच्या संशोधकांचा दावा

datta jadhav
error: Content is protected !!