तरुण भारत

आज दुपारी राफेल भारतात

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

फ्रान्सहून दुबईला पोहचलेली 5 राफेल विमाने आज बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या आसपास भारतात येणार आहेत, अशी माहिती वायूदलाने दिली आहे. ही विमाने हरियाणातील अंबाला येथील वायूदलाच्या विमानतळावर पोहचतील. या विमानांच्या स्वागताची जोरदार सज्जता ठेवण्यात आली आहे. तसेच लोकांनी विमाने पाहण्यासाठी विमानतळ परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी करू नये म्हणून अनुच्छेद 144 (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे.

Advertisements

मंगळवारी ही विमाने दुबईत असलेल्या फ्रान्सच्या वायूतळावर पोहचली. तेथे त्यांचे परीक्षण करण्यात आले. भारतात पोहचल्यानंतरही त्यांचे पुन्हा सखोल परीक्षण करण्यात येणार आहे. हे परीक्षण, अभ्यास व सराव काही दिवस चालणार असून एक आठवडय़ानंतर ही विमाने भारत-चीन सीमेवर नियुक्त होणार आहेत.

वायुमंडलात इंधन भरले

फ्रान्सहून दुबई येथे येताना या विमानांमध्ये ती वायुमंडलात असतानाच इंधन तेल भरण्यात आले. त्यामुळे या विमानांचा पल्ला जवळपास दुप्पट वाढविणे शक्य होणार आहे.

Related Stories

पंजाब : कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 56 हजार 839 वर

Rohan_P

आता सरकार विकणार १०० टक्के शुद्ध सोनं

Abhijeet Shinde

दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले

Patil_p

उत्तर प्रदेश विधानसभा उपाध्यक्षपदी नितीन अग्रवाल

Patil_p

बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलमध्ये भाजप चमकला

Patil_p

मनोज सिन्हा यांचा राज्यपालपदी शपथविधी

Patil_p
error: Content is protected !!