तरुण भारत

अमेरिकेच्या दोन लसी प्रगतीपथावर

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

कोरोनाच्या जागतिक संकटावर मात करण्यासाठी अमेरिकेने जोरदार प्रयत्न चालवले असून या देशाच्या दोन लसींनी आता सज्जतेचा अंतिम टप्पा गाठला आहे. मॉडर्ना आणि फित्झर या कंपन्यांनी या लसींची निर्मिती केली आहे. त्यांची परीक्षणे आता 30 हजार लोकांवर सुरू करण्यात येणार आहेत. या परीक्षणांचे परिणाम समाधानकारक असल्यास त्यांचे उत्पादन हाती घेण्यात येणार असून या वर्षाच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या वृत्तामुळे या दोन्ही कंपन्यांच्या समभागांच्या दरात मोठी वाढ झाली.

Advertisements

अमेरिकेचीच बायोएनटेक ही कंपनीही लस बनवत असून या लसीचीही परीक्षणे सुरू करण्यात आली आहेत. या सर्व कंपन्यांनी लसनिर्मितीत मोठी प्रगती साधली आहे. त्यामुळे काही महिन्यातच कोरोनाच्या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आता अधिक आत्मविश्वासाने व्यक्त करण्यात येत आहे.. फित्झर कंपनीने अमेरिकेच्या सरकारशी करार केला असून लसीचे 5 कोटी डोसेस सरकार विकत घेणार आहे. हा दोन अब्ज डॉलर्स (साधारणतः 15 हजार कोटी) रकमेचा आहे.

Related Stories

फिलिपाईन्स भारताकडून खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र

datta jadhav

इस्रायलला शस्त्रास्त्र पुरविणार अमेरिका

Patil_p

लस उत्पादक कंपन्यांवर 80 लाख सायबर हल्ले

Patil_p

स्पेनमध्ये हिंसाचार

Patil_p

सुटका करण्याच्या नादात नावे दिली !

Patil_p

300 मजुरांना बाधा

Patil_p
error: Content is protected !!