तरुण भारत

विश्वनाथन आनंदचा पहिला विजय

वृत्तसंस्था/ चेन्नई

माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने लेजेंड्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतील सहा पराभवांची मालिका खंडित करताना सातव्या फेरीत बोरिस गेलफँडला एक डाव बाकी असतानाच 2.5-0.5 असे हरवून पहिला विजय नोंदवला.

Advertisements

2012 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप लढत याच दोघांत झाली होती. त्याचाच हा रिप्ले होता. त्यावेळी क्लासिकल लढतीत बरोबरी झाल्यानंतर रॅपिड डाव घेण्यात आले होते आणि आनंदने त्यात बाजी मारत विश्वविजेतेपद स्वतःकडेच राखले होते. येथील सामन्यात मात्र गेलफँडपेक्षा आनंद खूपच सरस खेळताना दिसला. आनंदने या स्पर्धेची सुरुवात संथपणे केली. मात्र गेल्या दोन फेऱयांत त्याने आर्मागेडॉन टायब्रेकपर्यंत डाव लांबवत गुण मिळविले आहेत. सातव्या फेरीत तर त्याने पूर्ण तीन गुण वसूल केले.

‘गेल्या तीन दिवसांचा विचार करता ही स्पर्धा पूर्णतः खराब गेली असे म्हणता येणार नाही. मात्र विजय मिळविल्यानंतर खूप बरे वाटले. खरं म्हणजे आर्मागेडॉनबद्दल मी विसरूनच गेलो होतो. यामध्ये चालीनंतर वाढीव वेळ मिळत नाही. पण नियमित खेळात मात्र प्रत्येक चालीनंतर वाढीव वेळ मिळत असतो. आर्मागेडॉनमध्ये फक्त पटावरील खेळ महत्त्वाचा व निर्णायक ठरतो,’ असे आनंद म्हणाला.

दरम्यान, वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने आपला जबरदस्त फॉर्म कायम राखताना रशियाच्या पीटर स्विडलरला हरवून सलग सातवा विजय मिळविला. या दोघांतील पहिले दोन डाव अनिर्णीत राहिले आणि तिसरा डावही अनिर्णीत राहिल्यानंतर चौथ्या डावात कार्लसनने स्विडलरला हरवून 2.5-1.5 अशा गुणांनी विजय मिळविला. मात्र स्विडलरने या लढतीत जोरदार संघर्ष केला होता. आणखी एक फॉर्ममध्ये असलेला खेळाडू इयान नेपोमनियाची याला पीटर लेकोने आर्मागेडॉनपर्यंत खेळण्यास भाग पाडले. मात्र अतिजलद टायब्रेकमध्ये नेपोमनियाचीने त्याला पूर्णतः नामोहरम केले. नेपोने 2 टूर्नामेंट गुण मिळविले असून तो कार्लसनच्या अगदी नजीक पोहोचला आहे.

अन्य लढतीत व्हॅसील इव्हान्चुकने माजी वर्ल्ड चॅम्पियन क्रॅमनिकचा 3-1, अनिश गिरीने चीनच्या लिरेन डिंगचा 2.5-0.5 असा पराभव केला. डिंगच्या पराभवाची मालिका या फेरीतही कायम राहिली. याशिवाय तो चीनमधून खेळत असल्याने या सामन्यावेळी त्याला वारंवार ‘डिसकनेक्शन’ला सामोरे जावे लागत होते.

Related Stories

फिनलंडचा डेन्मार्कवर विजय

Patil_p

रशियाची फिनलंडवर मात

Patil_p

ओसाका, जोकोविच दुसऱया फेरीत

Patil_p

विंडीज-इंग्लंड यांच्यात आज दुसरी लढत

Patil_p

ट्रिनबॅगो नाईट रायडर्सचा सलग नववा विजय

Patil_p

सिडनी टेनिस स्पर्धेत पाओला बेडोसा विजेती

Patil_p
error: Content is protected !!