तरुण भारत

अभियंत्यांची रिक्त पदे भरावीत

प्रतिनिधी/ सातारा

जलसंधारण विभागात कनिष्ठ अभियंता, उप विभागीय जलसंधारण अधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी ई.तांत्रिक संवर्गाच्या रिक्त जांगाचे प्रमाण 50ज्ञ् ईतके असुन रिक्त जागांमुळे लघुपाटबंधारे योजनांच्या कामावर विपरित परिणाम होत आहे.रिक्त जागा भरण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती राज्याचे कार्याध्यक्ष आर.वाय. शिंदे यांनी दिली.

Advertisements

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंता संवर्गाच्या रिक्त जागा विशेष बाब म्हणून तातडीने भरणे व उप विभागीय जलसंधारण अधिकारी पदावर पात्र कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देणे बाबत संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करूनही त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही.असे असतांना जलसंधारण विभागातील तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता भरुन काढण्यासाठी जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता,उप विभागीय जलसंधारण अधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी ई. पदावरील अभियंत्यांना जलसंधारण विभागात नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.या निर्णयास जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र ने तिव्र विरोध दर्शविला असुन ईतर विभागातील अभियंते आयात न करता जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंता पदावर नविन नियुक्त्या कराव्यात, उप विभागीय जलसंधारण अधिकारी पदावर पात्र कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Related Stories

कर्जाचे अमिष दाखवत 32 लाखाचा गंडा

Patil_p

आषाढी वारीदरम्यान पंढरपूरात आठ दिवस संचारबंदी!

Rohan_P

सातारा शहरात एकूण बाधित संख्या 9,234

Amit Kulkarni

इगतपुरीतील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांचा समावेश

Abhijeet Shinde

कार व ट्रकच्या भीषण अपघातात दोघे ठार

Patil_p

आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी स्विकारला पदभार

datta jadhav
error: Content is protected !!