तरुण भारत

सेंकड कोरोनटाइन झालेल्यांचा कचरा पार्किंगमध्ये पडून

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेच्या आरोग्य विभागात सगळाच सावळा गोंधळ सुरू झाला आहे.सातारा शहरात अनेक ठिकाणी कोरोनटाइन झालेले कुटूंब आहेत.त्यांच्या घरातील कचरा तसाच पडून राहत आहे.त्या परिसरातल्या नागरिकांनी तक्रार केली तरीही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कसलीही कार्यवाही होत नाही.आरोग्याचा प्रश्न बिकट बनला आहे.सध्या पालिकेत वशिलेबाजी मोठय़ा प्रमाणात सुरू असून ज्यांच्या डोक्यावर हात त्यालाच मान मिळतो. साधा लिपिक विभाग प्रमुख तर खाजगी चालक अधिकायाच्या सरकारी वाहनाचे सारथी बनले आहेत.एवढेच नव्हे तर दस्तुरखुद्द आरोग्य सभापती यांच्या वॉर्डात सोमवारी निर्जंतुक फवारणी करण्यात आली नव्हती.बिगारी महिलांचे आंदोलन स्थगित झाल्याचे समजते.

Advertisements

सातारा शहरात अनेक कुटूंब बाहेरून आलेली आहेत.ते आपल्या प्लॅटमध्ये कोरोन टाइन झालेले आहेत.असे असताना त्या कुटूंबाकडून दररोज होणारा कचरा पालिकेकडून उचलला जात नाही.पालिकेकडून त्या बाबत कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय झाला नाही.येथील मंगळवार पेठेत काशी विश्वेश्वर मंदिराच्या लगत सुकृत अपरमेण्ट आहे.तेथे मुंबईहुन तीन जण दि.23रोजी आले असून ते कोरोन टाइन झाले आहेत.त्या अपारमेण्टमध्ये सहा कुटूंब राहतात.कोरोनताईन झालेले कुटूंब आपला कचरा पार्किंगमध्ये आणून ठेवत आहे.तेथे स्वच्छता कर्मचारी हा भीतीपोटी तो कचरा उचलून घंटा गाडीत टाकत नाही.तेथेच कचरा पडून असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता झाल्याची तक्रार स्थानिकांनी पालिकेत केली परंतु अजून कोणतीही कार्यवाही झाली नाही.त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची अनास्था दिसतं आहे.

पालिकेत वशिलेबाजीला आलाय उत

सातारा पालिकेत ज्याच्या डोक्यावर हात त्याचेच भल होत आहे.असे अनेक प्रकार पालिकेत पहायला मिळतील. सध्या पालिकेत एका लिपिकास थेट विभागप्रमुख केल्याने इतर लिपिक नाराज आहेत.तर चक्क एका अधिकायाच्या गाडीचे स्टेअरिंग खाजगी वाहन चालकाच्या हातात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

आरोग्य सभापतीच्या पेठेत निर्जंतुक फवारणीला प्रारंभ

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराचा एकेक किस्सा खरोखरच हसण्यासारखा आहे.सोमवारी सकाळीच जाहीर झालेल्या यादीत केसरकर पेठेत 37 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे.हा रुग्ण आरोग्य सभापती यांच्या पेठेतील असल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे.काल दिवसभर सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी पालिकेत खुडमूड करत बसले होते.मात्र, दस्तुरखुद्द आरोग्य सभापती यांच्या पेठेत आढळून आलेल्या बाधित रुग्णाच्याबाबत काहीच माहिती नव्हते.त्यामुळे रात्री उशिरापर्यंत निर्जंतुक फवारणीसाठी गाडी ही गेली नव्हती. आरोग्य विभागाचे काम बैल गेला झोपा गेला अशीच चर्चा सुरू होती.दरम्यान, तरुण भारतने रात्री चौकशी केल्यानंतर सकाळी त्यांच्या पेठेत निर्जंतुक फवारणीस प्रारंभ केला होता.पालिकेच्या गाडय़ाच्या औषध फवारणीचा धुरळा उडत होता.

बिगारी कर्मचायांचे आंदोलन स्थगित?

गेले चार दिवस आरोग्य विभागाच्या महिला कर्मचायांनी पगारासाठी पुकारलेले आंदोलन काम बंद आंदोलन अनोख्या स्टाईलने स्थगित करायला भाग पाडल्याचे समजते.काही महिलांची बदली केली तर काहींना दमबाजी केली, काहींना कामावरून काढून टाकले, अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Related Stories

मिसेस गृहमंत्र्यांच्या आपुलकीने पोलीस भारावले

Patil_p

घरोघरी लसीकरण मोहीम पुण्यातून सुरू करणार : ठाकरे सरकार

Rohan_P

कोविड मार्गसूचींचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई

Patil_p

सातारा : एक अहवाल पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यु

Abhijeet Shinde

जिल्ह्यात दुपारी बारा वाजेपर्यंत ७५ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी चार वर्षे शिष्यवृत्तीपासून वंचित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!