तरुण भारत

जन्मदात्या मुलानेच मित्रांच्या मदतीने केला बापाचा खून

टेंभुर्णी पोलिसांना खुनाचा छडा लावण्यात यश

प्रतिनिधी/ बेंबळे

Advertisements

शिराळ ता. माढा येथील खासगी सावकारकी करणाऱ्या संजय मारूती काळे वय ५० यांचा खुनाचा छडा टेंभुर्णी पोलिसांना लावण्यात यश आले असून फिर्यादीच आरोपी निघाला आहे. शेवरे ता. माढा हद्दीत उजनी कालव्या नजीक संजय काळे यांचा खून करून त्यांचा मृतदेह टायर पेटवून पुरावा नष्ट कराण्याचा उद्देशाने त्यांचा चारचाकी वाहनासह पेटवून दिला होता. ही घटना २६ रोजी सकाळी उघडकीस आली होती. मयताचा मुलगा आकाश संजय काळे वय २० हा मुख्य आरोपी निघाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , मयताच्या मुलासह आणखी दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून ३ ऑगस्ट पर्यंत सहा दिवासांची पोलीस कोठडी तीन आरोपींना मिळाली आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार रविवारी सकाळी सात वाजता संजय काळे यांचा वाहनासह मृतदेह अर्धवट जळालेल्या आवस्थेत टेंभुर्णी अकलूज रस्त्यापासून सहाशे फूट अंतरावर झाडीत मिळून आला होता. मयत संजय काळे यांचा मुलगा आकाश याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आज्ञात आरोपींचा विरोधात फिर्याद दिली होती. तो फिर्याद देत असताना टेंभुर्णी पोलीसांनी त्याचा जबाबात वीसंगती आढळून येऊ लागल्याने संशय बळावला होता. विश्वासात घेऊन विचारताच आपल्या बापाचा खून मीच आणखी दोन साथीदारासह केला असल्याची कबूली सोमवारी सकाळी दिली होती. संजय काळे यांचा घरातच खून करून छोटा हत्ती या वाहनात घालून शेवरे येथील कॕनल फाटा येथे नेला होता. आणखी दोन साथीदार ताब्यात घ्यायचे असल्याने टेंभुर्णी पोलीसांनी गुप्तता पाळली होती. यातील लक्ष्मण रघुनाथ बंदपट्टे वय २७, अल्लाउद्दीन उर्फ आलम बासू मुलाणी दोघे रा. सुर्ली ता. माढा या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक अतूल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे, सुशिल भोसले, सहाय्यक फौजदार आशोक बाबर, अभिमान गुटाळ, दत्तात्रय वजाळे, धनाजी शेळके, विनोद पाटील, बाळासाहेब चौधरी, अन्वर आत्तार यांचा पथकाने केली.

Related Stories

आरोपीला न्यायालयात रिमांड न मागण्यासाठी चार लाख रुपये लाचेची मागणी

Abhijeet Shinde

खड्डेमुक्त मिरज शहरासाठी आम आदमीच्या कार्यकर्त्यांचे श्रमदान

Abhijeet Shinde

काँग्रेसला धक्का : महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

Abhijeet Shinde

इचलकरंजीत शेकडो परप्रांतीय कामगार रस्त्यावर

Abhijeet Shinde

भिक्षेकरी गृहाजवळ तीन चारचाकी गाडीचा अपघात

Patil_p

बांग्लादेश सीमेलगतच्या नुधीया जिल्ह्यात मजुरांना पोहचवले सुखरूप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!