तरुण भारत

गायत्री आवडेला 96.5 टक्के गुण

प्रतिनिधी / मडगाव

कुडचडेच्या दी न्यू एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटची विद्यार्थिनी गायत्री उत्कर्ष आवडे हिला दहावीच्या परीक्षेत 96.5 टक्के गुण मिळाले. कुडचडे केंद्रात ती प्रथम आली. तिच्या हायस्कूलचा निकाल 91.45 टक्के येवढा लागला आहे. गायत्री वडिल उत्कर्ष आवडे हे सरकारी वकील असून आई शिक्षिका आहेत.

Advertisements

गायत्रीने गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयात शंभर गुण मिळविले आहे तर इंग्रजी (90), हिंदी (94) व कोकणी-मराठी (95) टक्के गुण मिळविले आहेत. याच विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी 95 टक्के तर पाच विद्यार्थ्यांनी 90 व त्यापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. या हायस्कूलातून एकूण 185 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील 169 उत्तीर्ण झाले व हायस्कूलचा एकूण निकाल 91.45 टक्के येवढा लागला.

दी न्यू एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट हायस्कूलचे चेअरमन प्रदीप काकोडकर, व्यवस्थापक सत्येश काकोडकर तसेच शिक्षकांनी गायत्री उत्कर्ष गावडे हिचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

काही नेते स्वताच्या स्वार्थासाठी सरकारवर दबाव आणण्याचे काम करतात

Patil_p

महसूलबुडव्या खाण कंपन्यांना पाठविणार नोटिसा

Patil_p

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचे आमरण उपोषण सुरु

Amit Kulkarni

पणजी मनपाचा सुमारे पाच कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प

Amit Kulkarni

सरकारने नीट आणि जेईईच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात एनएसयूआयची मागणी

GAURESH SATTARKAR

राशोल येथे पावसाचा पहिला बळी

Omkar B
error: Content is protected !!