तरुण भारत

त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं : रोहित पवार

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

Advertisements


त्यातच आता कर्जत जमखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी या विधानावरून ‘भाजपमधील मोठ्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं’ अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. 


रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता म्हणले की, आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं BJP तील एक मोठे नेते म्हणाले.सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता 5 वर्षात BJP पासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी #MVA त घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा! असे म्हटले आहे. 


राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊ असे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, आम्ही एकत्र आलो तरी निवडणुका मात्र आम्ही वेगळ्या लढवणार असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल केले होते. बिहार राजकारणाचा दाखला देत त्यांनी महाराष्ट्रात ही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली होती. 

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 4 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेवून निवडणूक प्रक्रिया पार पाडा

Rohan_P

महाराष्ट्रात आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

Abhijeet Shinde

पुणे : भाषादिनानिमित्त ‘चपराक’चा साहित्य महोत्सव

datta jadhav

पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही, तर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला ‘हा’ पर्याय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!