तरुण भारत

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर, 105 नव्या रुग्णांची भर

उमरगा तालुका बनतोय कोरोनाचा केंद्रबिंदू

प्रतिनिधी/उस्मानाबाद

जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून सध्या प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली आहे. प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करूनही नागरिक कोरोनाच्या बाबतीत गंभीर नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे.

Advertisements

काल, मंगळवारी, (दि. 28) उस्मानाबादेत 38, उमरगा येथे 47, तुळजापूर 5, कळंब 6, परंड्यात 3 व वाशीत 07 असे एकूण 105 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या 834 वर पोहचली असून उपचारानंतर बरे होवून घरी गेलेले रुग्ण 482 आहेत. 308 रुग्ण उपचार घेत आहेत तर 44 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत 487 स्वॅबचे नमुने चाचणीसाठी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व उस्मानाबादेतील विद्यापीठ उपकेंद्रात पाठवीणेत आले होते. त्यानुसार 370 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून 105 पॉझिटिव्ह, 204 निगेटिव्ह 61 इनक्न्वलुजीव, 117 जणांचा अहवाल प्रलंबीत आहे. तर अ‍ॅन्टी रॅपीड टेस्ट मध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही . त्यामुळे रुग्णाची संख्या 834 वर पोहंचली आहे. सदर अहवाल बुधवार (दि.29) दुपारी 12.30 वाजणेच्या सुमारास प्राप्त झाला. त्यामुळे उस्मानाबाद व उमरगा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे .

Related Stories

सोलापूर शहरात 43 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, 5 जणांचा मृत्यू

triratna

सोलापूर : बुधवारी माघ द्वादशीलाही विठ्ठलाचे देऊळबंद

triratna

ज्यांना आमचे काम दिसत नाही, त्यांनी मोफत डोळ्यांची तपासणी करून घ्यावी

triratna

सोलापूर : संभाजीराजेंच्या आंदोलनास मराठा बांधवांचा पाठिंबा

triratna

भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ‘या’ व्यक्तीच्या अटकेने ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता

triratna

”युपीए राज्याचा विषय नाही त्यामुळे जिल्हा स्तरावरील लोकांनी बोलू नये”

triratna
error: Content is protected !!