तरुण भारत

ब्राझीलमध्ये 17.21 लाख रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :

ब्राझीलमध्ये आतापर्यंत 24 लाख 84 हजार 649 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 17 लाख 21 हजार 560 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

ब्राझीलमध्ये मंगळवारी 41 हजार 169 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 955 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ब्राझीलमध्ये 6 लाख 74 हजार 455 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8 हजार 318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 88 हजार 634 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 01 हजार 96 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 44 लाख 98 हजार 343 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर भारतात ही संख्या 15 लाख 35 हजार 335 एवढी आहे.

Related Stories

ईडी, सीबीआय, रॉ यांना विनापरवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार अबाधित

Abhijeet Shinde

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा 1 हजारपेक्षा कमी रुग्ण; अरविंद केजरीवाल म्हणाले …

Rohan_P

कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 546 नवे रुग्ण

Rohan_P

आकाशात भरारी घेणे आता शक्य

Patil_p

जगातील पहिला रोबोट चित्रकार

Amit Kulkarni

JEE, NEET परीक्षा वेळेतच होणार : सुप्रीम कोर्ट

datta jadhav
error: Content is protected !!