तरुण भारत

हिमाचल प्रदेश : मुलींना सैन्यात जाण्याची संधी; चार सप्टेंबरपासून अंबालामध्ये भरती

ऑनलाईन टीम / मंडी : 


हिमाचल प्रदेशातील मुलींना सैन्यात जाण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सेनेकडून अंबालामधील खरगा स्टेडियममध्ये 4 ते 14 सप्टेंबर या कालावधीत ही सैन्य भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, जनरल ड्यूटी ( महिला सैन्य पोलीस) च्या 99 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी मुलींना 31 ऑगस्टपर्यंत सैन्याच्या वेबसाईटवर  ऑनलाईन अर्ज करावे लागतील. यासाठी सैन्याकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. 


सैन्य भरती कार्यालय मंडीचे निर्देशक कर्नल एम. राजराजन यांनी सांगितले की, या भरतीमध्ये हिमाचल, हरियाणा येथील मुलींना सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. या भरतीसाठी मुलींचे वय 17 ते 21 यामधील असणे आवश्यक आहे. यासह या मुली इयत्ता दहावीच्या परीक्षेत पास होण्यासह प्रत्येक विषयात 33 टक्के गुण आणि सर्व विषयांचे मिळून 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

तसेच त्यांनी मंडी, कुल्लू आणि लाहौल – स्पिती मधील मुलींना या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Related Stories

गुजरातच्या किनाऱ्यावर 400 कोटींचे हेरॉईन जप्त

datta jadhav

दिल्लीत 2,6760 नवे कोरोना रुग्ण; 39 मृत्यू

Rohan_P

काँग्रेस नेते कमलनाथ यांची प्रकृती बिघडली

Patil_p

आयएनएस कोची जहाजातून 184 जणांची सुटका

Abhijeet Shinde

खंडेराया-म्हाळसा विवाहसोहळा संपन्न :विवाहसोहळा संपन्न

Sumit Tambekar

ऊस-साखर उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता

Patil_p
error: Content is protected !!