तरुण भारत

नेस्ले इंडियाचा निव्वळ नफा 11 टक्के वाढला

नवी दिल्ली

 जूनला संपलेल्या तिमाहीत नेस्ले इंडियाने निव्वळ नफ्यामध्ये 11 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. विक्रीत वाढ व करांचा कमी बोजा यामुळे हा नफा कंपनीने कमावला असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल ते जूनपर्यंतच्या तिमाहीत नेस्ले इंडिया कंपनीने करपश्चात नफा 486 कोटी रुपयांचा मिळवला आहे. यापूर्वी मागच्या वषी याच कालावधीतला कंपनीचा नफा 437 कोटी रुपयांचा होता. या कालावधीत यंदा विक्री 1.96 टक्क्मयांनी वाढून ती 3 हजार 041 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेले तीन महिने कंपनीला अनिश्चितता आणि तणावाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी कधीच अशी परिस्थिती अनुभवायला मिळाली नसल्याचे कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांनी मत व्यक्त केले आहे.

Advertisements

Related Stories

डाटा केंद्र विकसित करण्यासाठी अदानी राबविणार संयुक्त उपक्रम

Patil_p

हय़ुंडाईची विक्री 70 टक्के घटली

Patil_p

…अखेर ‘झोमॅटो’ शेअर बाजारात लिस्ट

Amit Kulkarni

‘डीएचएफएल’साठी अदानीसह चार जणांची बोली

Patil_p

बायजूसकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध

Patil_p

कॅनरा बँकेच्या तीन नवीन योजना

Patil_p
error: Content is protected !!