तरुण भारत

बुधवारी 301 पॉझिटिव्ह तर 11 जण दगावले

आयसीएमआरमधील दोघा जणांना बाधा, 8 डॉक्टरांना कोरोनाची लागण, एअरफोर्समधील आणखी 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/बेळगाव

Advertisements

बेळगाव शहर व जिल्हय़ातील 301 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बेळगाव शहरातील 57 व तालुक्मयातील 39 जणांचा यामध्ये समावेश आहे. याबरोबरच अथणी, चिकोडी, रायबाग, खानापूर तालुक्मयातील बाधितांचाही बुलेटिनमध्ये समावेश आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

ज्या आयसीएमआर लॅबमध्ये स्वॅब तपासणी केली जाते, त्या लॅबमधील दोन तज्ञांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर बिम्समधील एक डॉक्टर व दोन कर्मचाऱयांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी शहर व जिल्हय़ातील एकूण 8 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या कार्यालयातील आणखी एका कर्मचाऱयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हालभांवी येथील आयटीबीपीचे चार जवान, मच्छे येथील राज्य राखीव दलातील तीन जवान व हिरेबागेवाडी पोलीस स्थानकातील दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सांबरा एअरफोर्स ट्रेनिंग सेंटरमधील आणखी 15 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

अशोकनगर, सरस्वतीनगर, कुवेंपूनगर, वीरभद्रनगर, देवराज अर्स कॉलनी-बसवनकुडची, यमनापूर, काकती, वैभवनगर, पिरनवाडी, शहापूर, शिवाजीनगर, वडगाव, शिवबसवनगर, गणेशपूर, श्रीनगर, विश्वेश्वरय्यानगर, सदाशिवनगर, विजयनगर-हिंडलगा, यळेबैल, उज्ज्वलनगर, रामतीर्थनगर, आनंदवाडी-शहापूर, आझादनगर, अलारवाड, कपिलेश्वर कॉलनी, कावेरीनगर येथील 57 हून अधिक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये 279 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा उल्लेख असला तरी बुधवारी प्रत्यक्षात 301 जणांची यादी आली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 817 वर पोहोचली आहे. तर बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या 67 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 806 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळात व कोविड केअर सेंटरमध्ये 2 हजारांहून अधिक बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. एकूण 42 हजार 241 जणांच्या आरोग्यावर नजर ठेवण्यात आली असून आतापर्यंत 40 हजार 945 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. 36 हजारहून अधिक जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्हा सर्व्हेक्षणने दिलेल्या माहितीनुसार आणखी 1369 स्वॅब तपासणी अहवालांची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. जिल्हय़ात एकूण 7 हजार 448 जणांना 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर 7 हजार 565 जणांनी 14 दिवसांचे आणि 25 हजार 278 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे.

बेळगावबरोबरच अथणी, सौंदत्ती, हुक्केरी, चिकोडी, गोकाक, खानापूर, बैलहोंगल, रायबाग, रामदुर्ग तालुक्मयातही अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी बेळगाव पाठोपाठ गोकाक तालुक्मयातील 54 हून अधिक व अथणी तालुक्मयातील 40 हून अधिक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बेळगाव शहरात बाधितांची संख्या वाढतीच

बेळगाव शहर व उपनगरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढती आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. बाधितांच्या मृत्यूंचे प्रमाणही अधिक असल्याची माहिती मिळाली असून डॉक्टर, पोलीस, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. सरकारी डॉक्टरांबरोबरच खासगी डॉक्टरांची संख्याही वाढत चालली आहे. बेळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागातही फैलाव वाढतो आहे. गेल्या आठवडय़ाभरात कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. बेळगाव बाहेर तालुक्मयाच्या ठिकाणी सरकारी इस्पितळात काम करणाऱया अनेक कर्मचाऱयांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांपैकी ज्यांना लक्षणे नाहीत तशांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. उर्वरित बाधितांनाही लक्षणे नसणाऱयांवर 14 दिवस घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.

Related Stories

लाल-पिवळा हटवा; अन्यथा प्रत्येक चौकात भगवा

Patil_p

अंजुमनतर्फे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Amit Kulkarni

कणकुंबीजवळ 11 लाखांची दारू जप्त

Patil_p

मराठी माध्यम शिक्षकांसाठी संगणक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

Patil_p

खानापुरातील कार्यालयात निवडणुकीनंतर शुकशुकाट

Omkar B

बसस्थानक रस्त्यावरील दुभाजक हटविला

Amit Kulkarni
error: Content is protected !!