तरुण भारत

कोल्हापूर : जिल्हय़ात कोरोनाचे 11 बळी, 548 पॉझिटिव्ह रूग्ण

कोरोना बळींची संख्या 153 वर, जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5,672

आजरा, शिरोळ, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, पन्हाळय़ात नव्याने रूग्ण, कंटेन्मेंट झोनची वाढती संख्या, होम कोरोंटाईनच्या संख्येत सातत्याने वाढ

Advertisements

कोल्हापूर / प्रतिनिधी

जिल्हय़ात बुधवारी रात्री 10 वाजेपर्यत कोरोनाने 11 जणांचा  मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 153 झाली आहे. रात्री 11 वाजेपर्यत 548 पॉझिटिव्ह रूग्ण झाल्याने सलग दुसऱया दिवशी पॉझिटिव्ह रूग्णाचा आकडा 500 वर पोहोचला आहे. जिल्हय़ात सामुहिक संसर्गामुळे अन्य गावांत रूग्ण मिळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आजरा, शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड तालुक्यात नव्याने रूग्ण मिळाल्याने कंटेन्मेंट झोनची संख्या वाढत आहेत. त्यासोबत होम कोरोंटाईन होणाऱयांची संख्याही वाढत आहे.

जिल्हय़ात बुधवारी सायंकाळपर्यत कोरोनाने 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये इचलकरंजीतील गावभाग येथील 50 वर्षीय पुरूष, पाटील मळा येथील 75 वर्षीय वृद्ध, सरस्वती मार्केट येथील 89 वर्षीय वृद्धा, सुतार मळा येथील 80 वर्षीय वृद्धा आणि रूई येथील 55 वर्षीय महिला, तसेच ठोंबरे गल्ली, कसबा बावडा येथील 45 वर्षीय पुरूष, उत्तरेश्वर पेठेतील 70 वर्षीय वृद्ध, गांधीनगर येथील 40 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील 54 वर्षीय पुरूष, गांधीनगर येथील 40 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या 11 झाली असून एकुण कोरोना बळी 153 झाले आहेत. जिल्हय़ातील ग्रामीण भागात रूग्णांची संख्या वाढत आहे. सामुहिक संसर्गातून नवी गावे पुढे येत आहेत.

सरस्वती मार्केट 2, शिरदवाड, मुरदांडे मळा, भालेकरवाडी, पोहाळे, निगवे दुमाला, खुपिरे, करंजफेण, जुना चंदुर रोड शहापूर, पाटील मळा इचलकरंजी, बंडगर मळा इचलकरंजी, तळंदगे, गावभाग, सांबरे, कंदलगाव, किणी, येवलुज प्रत्येकी 1, कळंबे तर्फ ठाणे 2, सातवे 2, देवाळे 2, आजरा 2, गडहिंग्लज 3, सोनतळी 3, उजळाईवाडी 2, पुष्पनगर, गारगोटी, पडळ, कळे, हेरवाड प्रत्येकी 1, कसबा वाळवे 8, तळेवाडी 1, लाडवाडी 4, शेळेवाडी 1, राशिवडे 2, सोन्याची शिरोली 2, चंदे 1, सावर्डे 1, वारणा कोडोली 6, पोर्ले 3, करंजफेण 3, शहापूर 1, अर्जुंनवाडा 1, अलाबाद कागल 1, केंबळी 4, मेन रोड कागल 1, तेलवे 1, कुशीरे 1, दाणेवाडी 1, मुरगुड ग्रामीण रुग्णालय 1, कागल घरकुल 1, हेरले 1, किणी 2, कोरोची 1, नागाव 1, नवे पारगाव 1, हुपरी 1, इचलकरंजी 1, अतिग्रे 4, निगवे दुमाला 4, गडहिंग्लज 1, धुमाळवाडी 1,आजरा 1, भादवन 1, चाफवडे 1, ऊत्तूर 1, पळशिवणे 1, वेंगरुळे 1, पुष्पनगर 1, गारगोटी 5, बसरेवाडी 1, कोगनोळी चिकोडी 1, मौजे वडगाव 1, आवळी 1, परळी 2, सातार्डे 1, शिंदेवाडी 1, शहापूर 2, इचलकरंजी दातार मळा 1, संग्राम चौक 9, पुजारी मळा 3, झेंडा चौक रांगोळी 1, विठ्ठल चौक हुपरी 1, सहकारनगर 1, जवाहरनगर 1, माळेवाडी 1, गणपती गल्ली नदीवेस 1, इचलकंरजी 1, कबनूर 4, हुपरी 3, टोप 2, निगवे दुमाला 1, गडहिंग्लज 1, कुरुंदवाड 2, हेरवाड 2, मजरेवाडी 1, आजरा 2, तांबिलवाडी 5, इचलकंरजी 1, दानोळी 2, जयसिंगपूर 19, कुरुंदवाड 3, उदगाव 1, मजरेवाडी 1, शिरदवाड 1, प्रयाग चिखली 1, हुपरी 7, कबनूर 6, किणी 3, इचलकरंजी 9, नरंदे 1, सांगरूळ 1, वडगाव 2, नागाव 3, रुकडी 2, रेंदाळ 5, अतिग्रे 2, पट्टणकोडोली 2, गडमुडशिंगी 1, साबळेवाडी 1, सांगली 1, कसबा बीड 1, चंदगड 1, तांबिळवाडी 2, तेरणी 3, गिजवणे 1, भादवन 1, गारगोटी 3, भेंडवडे 1, गोकुळ शिरगाव 1, कळ्बां 1, हरी चौक इचलकरंजी 1, यशवंतनगर 1, कांदे मांगले शिराळा 1,  सहकारनगर 5, गोसावी गल्ली 1, भीमनगर झोपडपट्टी 1, जिजामाता मार्केट 1 कोल्हापूर 1, गणेशनगर 1, ब्रह्मपुरी शिरोळ 1, सांगवडेवाडी 1, मातंग वसाहत वाघवे 1, आळते 1, राजराजेश्वरीनगर 5, शिवाजीनगर आजरा 1, दत्तोबा शिंदेनगर कळंबा 1, जवाहरनगर इचलकरंजी 1, मिरज 1, भोने माळ 1, मंगेश्वर कॉलनी उचगाव 1, तळंदगे 3, लिगाडे मळा 1, हरिजन वसाहत हातकणंगले 2, तारळे खुर्द राधानगरी 5, मांडुकली 1, साखरी 1, वाळवे खुर्द 1, विराज सिटी कागल 1, सोनाळी 1, लिंगनूर 1, करडय़ाळ 1, मेतके 1, मुरगुड 7, बेघर वसाहत वंदुर 7, इचलकरंजी 2, तारदाळ 4, भादोले 4, मंडावले 2, पुष्पनगर 1, पट्टणकडोली 1, लातूर 1

 कोल्हापूर शहरातील पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 112 वर

लक्षतीर्थ वसाहत 13, रेसकोर्स नाका 2, यादवनगर 1, जरगनगर 1,  राजारामपुरी 1, फुलेवाडी 1, साळुंके पार्क 1, दगडी चाळ, कसबा बावडा 1, महाडिक वसाहत 2, शनिवार पेठ 1, राजोपाध्येनगर 1, विक्रमनगर तिसरी गल्ली 1, टेंबलाईवाडी 1, शाहूपुरी पोलीस स्टेशन 1,  जिल्हाधिकारी कार्यालय 1, शाहूपुरी पहिली गल्ली 1, कसबा बावडा 2,  उत्तरेश्वर पेठ 3, जवाहरनगर 5, राजारामपुरी 1, सीपीआर हॉस्पिटल 1,  राज्योपाध्येनगर 1,  मंगळवार पेठ 1, टेंबलाईवाडी 2, दाभोळकर कॉर्नर 1, कसबा बावडा 2, साळोखे पार्क 2, पुईखडी 1, संभाजीनगर 1, दिलबहार तालीम 1, सीपीआर 1, नागाळा पार्क 3, राजारामपुरी अकरावी गल्ली 2, साकोली कॉर्नर 1, शाहूनगर राजारामपुरी 1, शाहूपुरी चौथी गल्ली 3,  राजारामपुरी बारावी गल्ली 1, मोरेवाडी 5, राजारामपुरी 1, मंगेशकरनगर 1, शाहूपुरी 1, फुलेवाडी 1, कोल्हापूर शहर 1, खरी कॉर्नर 1, शुक्रवार पेठ 2, विक्रमनगर 2, नागाळा पार्क 2, रविवार पेठ 1, तटाकडील तालीम रोड 1, यादवनगर झोपडपट्टी 1, बापूरामनगर कळंबा 1, वेताळ तालीम 1, गजानन महाराज नगर 1, सोना पार्क ताराबाई पार्क 1, जुनी मोरे कॉलनी संभाजीनगर 1, कोंडेकर गल्ली शिवाजी पेठ 1, मातंग वसाहत कसबा बावडा 1, जगदाळे कॉलनी प्रतिभानगर 1, मानस अपार्टमेंट शिवाजी पार्क 1, वेताळ तालीम शिवाजी पेठ 2, मोरबाळे गल्ली मंगळवार पेठ 1, बेकर गल्ली न्यू शाहूपुरी 1, पिंजर गल्ली कसबा बावडा 2

रात्री 10 पर्यत नव्याने 90 रूग्णांची भर

जिल्हय़ात परळी, महालवाडी, पाचगाव, मंगळवार पेठ, कळंबा रोड, पोर्ले, रूकडी, लक्ष्मीपुरी येथे प्रत्येकी 1, आपटेनगर 2, कळंबा 3, रविवार पेठ, रंकाळा टॉवर, लक्षतीर्थ वसाहत, राजेंद्रनगर, देवकर पाणंद, शिवगंगा कॉलनी प्रत्येकी 1, शिवाजी पेठ 3, अतिग्रे, तारदाळ, प्रथमेशनगर कळंबा प्रत्येकी 1, हुपरी 7, वडगाव 1, कबनूर, आळते 1, बेळगाव 2, अंबप 1, एसएससी बोर्ड 1, पन्हाळा 1, कसबा बावडा 1, कोगनोळी 1, शिवाजी पेठ 1, इचलकरंजी 1, राजेंद्रनगर 2, संभाजीनगर 1, सिद्धार्थनगर 7, मडूर 1, जवाहरनगर 4, मंगळवार पेठ 5, राजारामपुरी 1, पाचगाव 5, बिंदू चौक 1, उत्तरेश्वर पेठ 3, शनिवार पेठ 1, इचलकरंजी 2, कसबा बावडा 2, यादवनगर 1, कदमवाडी 1, सरनाईक माळ 1, गांधीनगर 1 यांचा समावेश आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने सकाळपर्यंत दिलेल्या रिपोर्टनुसार 992 जणांची  तपासणी झाली. त्यातील 770 जणांचे नमुने घेतले. पॉझिटिव्ह रुग्ण 246 असून एकूण 5075 झाले आहेत. 157 जणांना घरी पाठवले. एकूण कोरोना मुक्त संख्या 2092 झाली आहे. चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 78 वर्षीय महिला गुरुवार पेठ, 65  पुरुष इचलकरंजी, 78 वर्षीय पुरुष भेंडवडे आणि 59 वर्ष पुरुष आजरा यांचा समावेश आहे. आज पर्यंत कोरोना बळीची संख्या 142 झाली आहे. 1105 जणांची रिपोर्टपैकी 751 निगेटिव्ह आहेत.

Related Stories

महाराष्ट्रात आज दिवसभरात 11,111 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

कराडकरांसाठी आनंदवार्ता : कोरोनाला हरविणाऱ्या 11 जणांना कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Abhijeet Shinde

पोलीस कॉन्स्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात

Sumit Tambekar

मंदिर खुले झाल्याने गुड्डापूर करांनी केला आनंद उत्सव साजरा

Abhijeet Shinde

आचेगांवातही खगोलप्रेमी व विद्यार्थांनी अनुभवले सूर्यग्रहण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटात ‘व्हिजन’चा आधार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!