तरुण भारत

कंटेनमेंटमधून मुक्त करा, अन्यथा 3 ऑगष्टपासून बेमुदत उपोषण, मांगोरहिलमधील लोकांचा ईशारा, दोन दिवसांत होतात दोन महिने पूर्ण

प्रतिनिधी / वास्को

मांगोरहिल वास्कोतील कंटेनमेंट झोनला पुढील दोन दिवसांत दोन महिने पूर्ण होत आहेत. या वस्तीतील नागरिकांनी कंटेनमेंट झोनमधून आपली सुटका करण्याची मागणी वारंवार केलेली आहे. या मागणीसाठी आता या वस्तीतील नागरिकांनी बेमुदत उपोषण करण्याचा ईशारा दिला आहे. स्थानिक नगरसेवक सैफुल्ला खान यांनी बुधवारी हा निर्णय जाहीर केला.

Advertisements

मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनला दोन महिने पूर्ण होत असून कंटेनमेंट झोनमध्ये लोक अडकलेले असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासन योग्य पध्दतीने या वस्तीतील लोकांना सेवा पुरवू शकत नाही. अनेक कुटुंबांसमोर अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. त्यामुळे लोकांची सहन शक्ती हरवलेली असून या वस्तीतील सर्व लोकांची कोविड चाचणी करून कंटेनमेंट झोनचा प्रश्न मिटवा व आम्हाला मुक्त करा अशी लोकांची मागणी आहे. प्रशासन प्रचंड दिरंगाई करून लोकांना कोंडून ठेवीत असून हा अन्याय आहे. त्यामुळेच स्थानिक लोक येत्या 2 ऑगष्टपर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट पाहतील. अपेक्षीत कृती न केल्यास दि. 3 ऑगष्टपासून या वस्तीतील लोक बेमुदत उपोषणाला बसतील असे नगरसेवक सैफुल्ला खान यांनी म्हटले आहे.

सडय़ावरील ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूने आश्चर्याचा धक्का, दृष्य लक्षणे नसतानाही मृत्यू

हेडलॅण्ड सडय़ावरील गोवा राज्य पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीत राहणाऱया रेहमतुल्ला शाह या 71 वर्षीय व्यक्तीला बुधवारी सकाळी हेडलॅण्ड सडयावरील कोविड कॅअर सेंटरमध्ये मृत्यू आला. मात्र, या कोरोनाबाधीत व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये आश्चर्य पसरले आहे.

उपलब्ध माहितीनुसार मयत रेहमतुल्ला व त्याच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली होती. आठ दिवसांपूर्वी मयताला प्रथम चिखली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तर त्याच्या मुलाला सडय़ावरील कोविड कॅअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, मयत व्यक्तीला नंतर मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तीथे मयत व्यक्ती मंगळवारपर्यंत उपचार घेत होती. तर त्याच्या मुलाला सडय़ावरील कोविड कॅअर सेंटरमधुन मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर या कुटुंबातील मयताची पत्नी व एका मुलीला कोरोना बाधा झाल्याने त्यांनाही सडय़ावरील कोविड कॅअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यातच मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मयत रेहमतुल्ला याला कोरोनाची कोणतीही दृष्य लक्षणे नसल्याने मडगावच्या कोविड हॉस्पिटलमधून सडय़ावरील कोविड कॅअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले. परंतु बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांना मृत्यू आला. या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाला आणि वसाहतीतील नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोविड हॉस्पिटलमधून या ज्येष्ठ नागरिकाला कोणत्या आधारावर सडय़ावरील कॅअर सेंटरमध्ये तेथील डॉक्टरांनी पाठवले होते असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ते असिम्टोमॅटीक होते. त्यांची तब्येत बरी होती तर त्यांना अचानक मृत्यू कसा आला. किंवा त्यांची प्रकृती ठिक नव्हती तर त्यांना कोविड हॉस्पिटमधून सडय़ावरील हॉस्पिटलमध्ये का हलवण्यात आले असा प्रश्न उपस्थित झालेला असून कुटुबीयांनी हा प्रश्न डॉक्टरांना विचारण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मयत व्यक्तीवर सध्याकाळी अंत्यसंस्कारही करण्यात आले. मयत व्यक्ती मुरगांव तालुक्यातील 23 वा कोविड बळी ठरली आहे.

वास्को सीआयडी पोलिसांनाही कोरोनाची बाधा वास्को पोलीस स्थानकातील काही पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, ते आता बरे होऊन सेवेत रूजू झालेले असतानाच पुन्हा या पोलीस स्थानकाला कोरोनाने धक्का दिला आहे. या पोलीस स्थानकातील सीआयडी कार्यालयातील तिघा पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना फर्मागुडी व सडय़ावरील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कार्यालयात एकूण तेरा कर्मचारी असून एक पोलीस निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झालेले आहे. तर अन्य पोलिसांनी कोविड तपासणी करण्यास सुरू केले आहे. या प्रकारामुळे सध्या वास्कोतील सीआयडी कार्यालयातील कामकाजावर परीणाम होण्याची शक्यता आहे. विविध कंटेनमेंट झोनमधील नागरिकांकडे आणि कोविड ग्रस्त वस्त्यांमध्ये कामानिमित्त संपर्क आल्याने सीआयडी पोलिसांनाही कोरोनाची बाधा झालेली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

साखळीत 1.60 लाखांचा गांजा जप्त

Patil_p

सोनिया, राहुल गांधी विश्रांतीसाठी गोव्यात

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा ही भाऊसाहेबांना आदरांजली

Patil_p

आय-लीगमध्ये चर्चिल ब्रदर्सचा दुसरा विजय; पंजाब एफसीवर मात

Amit Kulkarni

साळगावात कोरोना टीका उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

समाजसेवक वॉल्टर डायस यांचे निधन

tarunbharat
error: Content is protected !!