तरुण भारत

कर्नाटकात बुधवारी पाच हजाराहून अधिक नवीन बाधित रुग्ण

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात बुधवारी पाच हजाराहून अधिक जणांना कोरोना संक्रमणाची लागण झाली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासात ५,५०३ नवीन रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

बेंगळूरमध्ये कोरोनाची २२७० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. बुधवारपर्यंत राज्यात एकूण कोरोनाची संख्या १,१२,५०४ होती. यातील आतापर्यंत ४२,९०१ लोक बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आता कोरोनाचे ६७,४४८ रुग्ण उपचारात आहेत.

बुधवारी राज्यातील २३९७ रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. राज्यात बुधवारी एकूण ९२ कोरोना बाधित रूग्णांचा बळी गेला, त्यापैकी ३० रुग्ण बेंगळूर मधील आहेत.

बेंगळूरमध्ये कोरोना रुग्णात वाढ
बेंगळूर शहरी जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६,२२४ वर गेली आहे. जिल्ह्यात बुधवारी १११८ रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. शहरात आतापर्यंत शहरात कोरोना संसर्गामुळे ९८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. बेंगळूरमधील वाढती कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे.

Advertisements

Related Stories

आमटीत पाल पडल्याने सहा जणांना विषबाधा

Patil_p

खानापूर आगारातून अखेर बससेवेला सुरुवात

Patil_p

बंदच्या पार्श्वभूमिवर शेतकऱयांची बैठक

Patil_p

सख्ख्या भावाच्या खूनप्रकरणी 5 जणांना अटक

Patil_p

पिरनवाडीत वसुबारस पारंपरिक पद्धतीने साजरी

Omkar B

गँगस्टर रवी पुजारीविरोधात आरोपपत्र दाखल

datta jadhav
error: Content is protected !!