तरुण भारत

भगवान महावीर अभयारण्याच्या जमिनीचा वापर प्रकल्पांसाठी

प्रकल्पांच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी थोपटले दंड

प्रतिनिधी / पणजी

भगवान महावीर अभयारण्य परिसर मोले येथे तीन मोठे सार्वजनिक प्रकल्प येत असल्याने या अभयारण्यातील 97.75 हेक्टर जमिनीचा वापर त्यासाठी केला जाणार आहे. या तिन्ही प्रकल्पांवरून नवा वाद आता निर्माण झाला असून या प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमींनी दंड थोपटले आहेत.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या तिन्ही प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरील माहिती विधानसभेत दिगंबर कामत यांच्या लेखी प्रश्नावर दिलेली आहे. त्यात पर्यावरण मंत्रालयाने 97.75 हेक्टर जमिनीवर हे तीन प्रकल्प येतील असे म्हटले आहे. रेल्वे मंत्रालयाला मात्र रेलमार्गाच्या समांतर मार्गाला  मंजुरी दिलेली नाही. दक्षिण मध्य रेल्वेने आणखी एका रेलमार्गासाठी 138.39 हेक्टर वनजमिनीचे रुपांतर करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. रेलमार्गाचे दुहेरीकरण केले जाईल. कॅसरलॉक ते कुळे व कुळे ते मडगावपर्यंतचा समावेश आहे. यातील 128.294 हेक्टर जमीन ही भगवान महावीर अभयारण्यात येते.

सार्वजनिक बांधकाम खात्याने राष्ट्रीय महामार्ग क्र. 4-अ आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 याच्या चौपदरीकरणासाठी 93.451 हेक्टर वनक्षेत्राचे रुपांतरण करण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे. यातील 31.015 हेक्टर जमीन ही महावीर अभयारण्यातील वनक्षेत्र आहे. वीजखात्यानेही 220 केव्ही ते 400 केव्ही वीजवाहिन्या टाकण्यासाठी 146.05 वनक्षेत्राच्या जमिनीचे रुपांतर करण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे. त्यातील 11.54 हेक्टर वनक्षेत्र हे महावीर अभयारण्यातील आहे. रेलमार्गाच्या दुपदरीकरणासाठी केंद्रीय वनमंत्रालयाने रेल प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे.

Related Stories

जि.पं. पालिका निवडणुका एकाचवेळी

Omkar B

अफगाणी विद्यार्थ्याच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करा

Patil_p

मुरगावात ईच्छुक उमेदवार पुन्हा प्रचाराला लागले, निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा

Amit Kulkarni

आपतर्फे आजपासून विज आंदोलन

Patil_p

उल्हास शेटये यांचे निधन

Omkar B

जवाहर नवोदयची ‘ती’ मुले दिल्लीस रवाना

Omkar B
error: Content is protected !!