तरुण भारत

अन्न वारंवार गरम करताय?

आपल्यातील अनेक जण अन्न वारंवार गरम करुन खात असतात. वास्तविक, एकदा शिजवलेले अन्न दुसर्यांदा गरम करुन खाणे आरोग्यशास्रानुसार अनुचित आहे.

  • दुधीभोपळा, पालक, मेथी, बीट यांसारख्या भाज्या वा त्या समाविष्ट असणारे पदार्थ पुन्हा गरम केल्यास त्यातील नायट्रेट नष्ट होऊन जाते. तसेच त्यातील पाण्याचा अंशही संपून जातो.
  • मशरुम, अंडी, चिकन किंवा मटणदेखील वारंवार गरम केल्यास त्यातील प्रोटिन आणि कॅल्शियम नष्ट होऊन जाते.
  • बटाटय़ामध्ये व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि काही प्रमाणात सी व्हिटॅमिन असते. परंतु बटाटा दुसर्यांदा किंवा त्याहून अधिक वेळा गरम केल्यास त्यात क्लोसट्रीडियम बोटुलिनम तयार होतो आणि तो बॅक्टेरिया निर्मितीस कारणीभूत ठरतो.
  • सामोसे, भजी, कचोरी यांसारखे एकदा तळलेले वा डीप फ्राय केलेले पदार्थ तर चुकूनही गरम करु नयेत. तसे करण्यामुळे त्यातील ट्रान्स फॅटचे प्रमाण वाढते आणि पोषकता कमी होते. हे ट्रान्सफॅट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते.

Related Stories

कोल्हापूर : शासनाच्या आरोग्य योजनेतून होणार ‘म्युकर मायकोसिस’वर उपचार

triratna

राज्यात आरोग्य विभागाची मेगाभरती – आरोग्यमंत्री राजेश टोपे

triratna

बाऊ नको ; दक्षता हवी

Omkar B

झोप कमी, जाडीची हमी!

Omkar B

तपासा तुमची ऑक्सिजन पातळी

Amit Kulkarni

डोळे का फडफडतात

Amit Kulkarni
error: Content is protected !!