तरुण भारत

सांगली: महापालिका क्षेत्रातील ९९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

सांगली / प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील कोरोनाची लक्षणे आढळलेल्या ९९ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान रॅपिड अँटिजेंन चाचणी जीवनदायिनी आहे. त्यामुळे नागरिकांनी ही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

 महापालिका क्षेत्रातील ५० वर्षे वयावरील तसेच अनेक आजार असलेल्या व्यक्तींची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्यात येत आहे. या चाचणी मध्ये कोरोना लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर होम आयसोलेशन करण्यात आले आहे. जवळपास ९९ रुग्णांवर घरातच उपचार सुरू आहेत. रुग्ण ज्या घरात राहणार आहेत त्या ठिकाणी स्वतंत्र रूम आणि स्वतंत्र स्वच्छता तसेच स्नानगृह, रुग्णांची काळजी घेणेसाठी एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. या सुविधा असतील तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह व्यक्तीला होम आयसोलेशन केले जाईल आणि मनपा आरोग्य यंत्रणेकडून त्या व्यक्तीची दोन दिवसांनी तपासणी केली जाणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पस्ट केले आहे. दरम्यान रॅपिड अँटिजेंन चाचणी बाबत गैरसमज नको, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Advertisements

Related Stories

सांगलीच्या शांतिनिकेतनमध्ये वृक्ष रक्षाबंधन

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात आढळले 106 कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

राज्यात मोफत कोरोना उपचार देण्याची जनता दलाची मागणी

Abhijeet Shinde

मिरज कोरोना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात २० खाटा वाढविल्या

Abhijeet Shinde

हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है ; संजय राऊतांचं सूचक ट्विट

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात 813 कोरोनामुक्त, नवे 580 रूग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!