तरुण भारत

बेंगळूर : चलनात नसलेल्या नोटा विक्री प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना केली अटक

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूर पोलिसांनी बंद झालेल्य नोटा विकणार्‍या आणि खरेदीदारांना कमिशन देण्याचे आमिष देणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे.

किरण कुमार (वय 32, रा. मगडी रोड, बी आर प्रवीण कुमार, मनसा नगर येथील आणि पवन कुमार, कलसीपल्यायम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर बेंगळूरच्या जलाहल्ली येथील एका अपार्टमेंटमध्ये चलनात नसलेल्या 1000 रुपयांच्या नोटा असलेल्या ग्राहकांची वाट पाहत असताना त्यांना अटक केली.

या तिघांकडून पोलिसांनी 30 लाख रुपयांच्या जुन्या नोटा ताब्यात घेतल्या असून त्यांच्यावर फसवणूकीचा आणि विशिष्ट बँक नोट्स (दायित्वाचा अंत करणे) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

Related Stories

सिद्धेश्वर पालखी महोत्सव भक्तीमय वातावरणात

Patil_p

विद्युत खांबांमुळे रस्ता बनला अरुंद

Patil_p

समर्थ सोसायटीच्या टिळकवाडी शाखेसाठी भूमीपूजन

Patil_p

वैभवनगर बसथांबा बनला अवैध धंद्याचा अड्डा

Omkar B

मंगळवारी जिल्हय़ात 219 नवे रुग्ण

Amit Kulkarni

डॉ.अंजली चिकोडी यांचा सत्कार

Patil_p
error: Content is protected !!