तरुण भारत

सांगली : तर संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करणार

प्रतिनिधी / सांगली

महापालिका क्षेत्रात कोविडसाठी अधिकृत करण्यात आलेल्या रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित रुग्णालायचा परवाना रद्द करू असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान मिरज येथील कोव्हिड रुग्णालय सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील आठ जणांच्यावर मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात मेस्मा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सेवा सदन हे खासगी हॉस्पिटल असून कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून आरक्षीत आहे. मात्र सेवासदन हॉस्पिटल मधील आठ कर्मचाऱ्यांनी कोव्हिड रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ केली.  त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्य हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा ज्या आरोग्य सेवकांना उपचारबाबत नियुक्ती देण्यात आली आहे मात्र ते हजर आले नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. याचबरोबर ज्या दवाखान्यांना कोविड हॉस्पिटल म्हणून परवानगी देण्यात आली आहे. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास असमर्थता दर्शवित असेल तर त्यांच्यावर परवाना रद्दची कारवाई करावी लागेल असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. 

Related Stories

लैंगिक अत्याचार प्रकरणी युवकास १० वर्षाचा सश्रम कारावास

triratna

सांगली : मत्स्यशेती योजनेत जुन्या शेतकऱ्यांना डावलल्याने मोठे नुकसान

triratna

गुंड बंटी जाधवला पंजाबमध्ये अटक

Patil_p

मराठा समाजाला न्याय्यहक्क मिळाला पाहिजे

triratna

मिरवणुका, महाआरतीवर बंदी

Patil_p

सोलापूर ग्रामीण भागात 179 कोरोना रुग्णांची भर, दोन मृत्यू

triratna
error: Content is protected !!