तरुण भारत

भव्य रामप्रतिमा ‘टाईम स्क्वेअर’ मध्येही झळकणार

वृत्तसंस्था /न्यूयॉर्क :

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राममंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. हे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचवेळी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील जगप्रसिद्ध टाईम स्क्वेअर येथे अतिभव्य डिजिटल रामप्रतिमा झळकणार असून अमेरिकन नागरीकांनाही प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडविण्याची व्यवस्था अमेरिकेतील भारतीयांच्या संस्थांनी केली आहे.

Advertisements

अमेरिकेन इंडिया पब्लिक अफेअर्स कमिटी या संस्थेचे अधिकारी जगदीश सेव्हानी यांनी बुधवारी ही माहिती दिली. टाईम स्क्वेअरमधील नॅस्डॅक या शेअरबाजाराच्या अतिभव्य पडद्यावर भूमीपूजनाचा लाईव्ह कार्यक्रम सादर होणार आहे. या पडद्याचे क्षेत्रफळ 17 हजार चौरस फूट आहे. याशिवाय या शहरातील इतर अनेक साईनबोर्डस् भाडय़ाने घेण्यात आले असून त्यावर भूमीपूजनाचा कार्यक्रम दाखविला जाणार आहे. हा केवळ आयुष्यात किंवा शतकात एकदाच होणारा प्रसंग नाहा. तर इतिहासात एकदाच घडणार असलेला प्रसंग आहे. याचे दर्शन अमेरिकेतील नागरीकांना भव्य स्वरूपात होणे आवश्यक आहे, असे सेव्हानी यांनी स्पष्ट केले.

Related Stories

बिहारमध्ये कोरोनाचे 1,439 नवे रुग्ण

Rohan_P

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फेस्टिव्हल ॲडव्हान्स अन् प्रवास रजा भत्ता

datta jadhav

अनुच्छेद 370 : उच्चाटनाची वर्षपूर्ती

Patil_p

शेतकरी आंदोलनावरून संसदेत गदारोळ

Patil_p

कॉपीराईट कायद्याचे अल्लंघनासंदर्भात रवि शंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट तासभर लॉक

Abhijeet Shinde

अमरिंदरसिंग यांनी घेतली अमित शहांची भेट

Patil_p
error: Content is protected !!