तरुण भारत

बेंगळूरमध्ये लवकरच होणार ऑनलाईन मद्य विक्री

बेंगळूर /प्रतिनिधी

मद्य प्रेमींना लवकरच घरबसल्या दारू मिळणार आहे. कर्नाटक सरकार दारूच्या ऑनलाइन विक्रीच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करीत आहे आणि या दिशेने संबंधित विभागाशी बैठक यापूर्वीच झाली आहे.

अशी माहिती मिळत आहे की, पहिल्या टप्प्यात बेंगळूर शहरात मोबाइल अ‍ॅपद्वारे दारूची होम डिलीव्हरी करण्याचा उत्पादन शुल्क विभागाचा विचार आहे. नंतर दारूची दुकाने आणि म्हैसूर सेल्स इंटरनॅशनल लिमिटेड या दुकानांच्या माध्यमातून राज्यातील इतर भागात त्याचा विस्तार केला जाईल.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त एम. लोकेश यांनी सर्व भागधारकांना प्रस्तावावर लेखी विचार व्यक्त करण्यास सांगितले आहे. या प्रस्तावावर एकमत झाल्यास राज्य सरकार ऑगस्टमध्ये या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू करू शकते. तसेच अलीकडेच शेजारच्या केरळ आणि महाराष्ट्रासह सहा राज्यांनी दारूच्या ऑनलाइन विक्रीला मान्यता दिली आहे.

बार आणि रेस्टॉरंट मालक निर्णयाच्या विरोधात
बार आणि रेस्टॉरंट मालकांचा सरकारच्या प्रस्तावाला विरोध आहे. कोरोनामुळे आधीच नुकसान झाले आहे. त्यामुळे बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांनी हा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती सरकारकडे केली आहे.

Advertisements

Related Stories

मण्णुरातील गटारी साफसफाई-औषध फवारणीसाठी आंबेवाडी ग्रा. पं.ला निवेदन

Amit Kulkarni

होळीवर पुन्हा कोरोनाचे सावट

Amit Kulkarni

कुंतीनगरमधील नागरिकांना प्यावे लागते दूषित पाणी

Omkar B

बँकांच्या संपामुळे डिजीटल व्यवहारांना पसंती

Amit Kulkarni

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहेर

Patil_p

खून करणाऱया ‘त्या’ सासरच्या मंडळींवर कारवाई करा

Omkar B
error: Content is protected !!