तरुण भारत

बेंगळूरमध्ये रुग्णवाहिका चालकाला मारहाण

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. गुरुवारी राज्यात ६ हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. यातच बेंगळूरमध्ये ३३ वर्षीय रुग्णवाहिका चालकाला कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली आहे. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जात असताना या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. यावेळी त्या मरण पावलेल्या बाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका चालकाला मारहाण केली. मारहाण झाल्यांनतर वाहनचालकाने सदाशिवनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यावेळी मरण पावलेल्या रुग्णाला रूग्णालयात घेऊन जाताना चालक ऑक्सिजन देत नसल्याचा आरोप 75 वर्षीय रूग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे.

याप्रकरणानंतर कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी रुग्णवाहिका चालकावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. मंत्री सुधाकर यांनी असे हल्ले होणे अमानुष आहेत, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या चालकांवर लोकांनी हल्ला करु नये. असे म्हंटले आहे.

Advertisements

Related Stories

दत्तक बालकाच्या पालकांनाही प्रसूती रजेचा लाभ मिळणार

Omkar B

हुबळी-लेंढा-मिरज मार्गावरील पॅसेंजर गाडय़ा सुरू करा

Amit Kulkarni

बाजारात गर्दी… रस्त्यांवर वाहतूक कोंडी

Patil_p

खाते उघडण्यासाठी बेळगाव पोस्ट कार्यालयात तोबा गर्दी

Rohan_P

आठवडाभरापासून इंधनाच्या दरवाढीचा भडका

Patil_p

सिद्धीविनायक स्पोर्ट्स संघाला अजिंक्यपद

Patil_p
error: Content is protected !!