तरुण भारत

लहान मुलांच्या शिंकेतून कोरोनाचा प्रसार अधिक वेगात

ऑनलाईन टीम / शिकागो : 

लहान मुलांच्या शिंकेतून कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याची शक्यता अमेरिकेतील शिकागोच्या शास्त्रज्ञांनी प्राथमिक संशोधनातून व्यक्त केली आहे. नुकतेच यासंदर्भातील संशोधन ‘जेएएमए पिडीयाट्रिक्‍स’या शोधपत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहे.

Advertisements

शिकागोच्या ‘एन अँड रॉबर्ट एच. लुरी बालरूग्णालयातील शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी पाच वर्षाखालील सौम्य लक्षणे असलेल्या 145 मुलांची निवड केली होती. तसेच 5 ते 17 आणि 18 ते 65 अशा वयोगटांचा तुलनात्मक अभ्यासही यावेळी करण्यात आला. प्रत्येकाच्या नाकातील विषाणू प्रसाराची क्षमता तपासण्यात आली. त्यावेळी लहान मुलांच्या नाकात द्रव पदार्थ अधिक असल्याचे आढळले. तसेच मोठ्या मुलांपेक्षा लहान मुलांच्या नाकातील द्रव पदार्थात जनुकांची संख्या अधिक असल्याचे आढळले. 

कोरोना विषाणूसाठी आवश्यक असणाऱ्या जनुकांची संख्या जास्त असल्याने लहान मुलांमधून कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो, अशी शक्यता प्राथमिक संशोधनातून शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. 

Related Stories

डीडीसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट : मुकेश सिंह

Rohan_P

पाँडिचेरीत आणखी दोन आमदारांचा राजीनामा

Patil_p

कॅस्ट्रो घराण्याचा राजकीय झंझावात विसावणार

datta jadhav

राज्य भाजपमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावर गोंधळ नाहीः मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

अमेरिकेत 30 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

‘या’ कारणामुळे गूगलने घनी सरकारची ई-मेल अकाउंट केली लॉक

datta jadhav
error: Content is protected !!