तरुण भारत

कलर टीव्हीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून बंदी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने देशात कलर टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. 

Advertisements

देशांतर्गत वस्तूंचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता इतर देशातून टीव्हीची मुक्त आयात करता येणार नाही. त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतात टीव्ही निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये चीन, व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया, इंडोनेशिया, थायलँड आणि जर्मनी यांचा समावेश आहे. भारतात सर्वाधिक टीव्ही सेट्स हे व्हिएतनाम आणि चीनमधून आयात केले जातात. सरकारच्या या निर्णयाने चीनला मोठा झटका बसणार आहे. 

केंद्र सरकारने हे निर्बंध 36 सेमी ते 105 सेमी आकाराच्या टीव्ही स्क्रीनसाठी घातले आहेत. तसेच 63 सेमी पेक्षा कमी स्क्रीन आकाराच्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेसाठीही हा आदेश लागू होणार आहे. मागील वर्षी भारतात 428 मिलियन डॉलर किंमतीच्या टीव्हीची आयात करण्यात आली होती. त्यामधील 293 मिलियन डॉलरचे टीव्ही व्हिएतनाममधून आयात करण्यात आले होते.

Related Stories

अमेरिकाही घालणार ‘टिकटॉक’वर बंदी

datta jadhav

विधान परिषद सदस्यत्वाचा सुशील मोदींचा राजीनामा

Patil_p

अजित पवारांकडून पोलीस मुख्यालयाची पाहणी, कामाच्या दर्जावरून ठेकेदाराची कानउघडणी

pradnya p

डोंगराळ भागातील लढाईसाठी भारताकडे सर्वात मोठी आणि अनुभवी सेना; चिनी लष्करी तज्ज्ञांचा दावा

pradnya p

महाराष्ट्रात आज 5493 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

जागतिक परिचारिका दिन! राहुल गांधी म्हणाले…

pradnya p
error: Content is protected !!