तरुण भारत

जम्मू काश्मीर : महबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत आणखी तीन महिने वाढ

ऑनलाईन टीम / जम्मू :

सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी तीन महिने महबूबा मुफ्ती नजरकैदेत राहणार आहेत. 

Advertisements


जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर मेहबूबा मुफ्ती 5 ऑगस्ट पासून नजरकैदेत आहेत. गृह विभागाकडून आदेश जारी केल्याप्रमाणे मुफ्ती या आपल्या अधिकारी आवास म्हणजेच फेयरव्यू बंगल्यात अजून तीन महिने नजरकैदेत राहतील. या बंगल्याला उप जेल म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

आदेशात म्हटले आहे की, कायदा लागू करणाऱ्या यंत्रणेने नजरकैदेचा कालावधी आणखी वाढवण्याची शिफारस केली आहे. यावर बारकाईने विचार केल्यावर हे गरजेचे असल्याचे लक्षात आले. 


फारुख अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांच्यासह प्रमुख नेत्यांना नजरकैदेतून सोडण्यात आले आहे. 


दरम्यान, आजच (शुक्रवारी) को पीपुल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन यांना जवळपास एक वर्षानंतर नजर कैदेतून मुक्त करण्यात आले आहे. स्वतः सज्जाद लोन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सरतेशेवटी एक वर्ष पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी मला सांगण्यात आले की, मी आता मुक्त आहे. केवढ्या गोष्टी बदलल्या आहेत. असं काही नाही की, जेल चा अनुभव माझ्यासाठी नवीन आहे. पहिल्यांदा जेलमध्ये जात होतो तेव्हा शारीरिक शोषण खूप होत असे. यावेळी गेलो तेव्हा मानसिक त्रास अधिक जाणवला. लवकरच मी बरच काही सिद्ध करेन. 

Related Stories

सलग तिसऱया दिवशी डिझेल दरात घसरण

Patil_p

घाईघाईने निर्बंध शिथिल करून धोका पत्करू नका : उद्धव ठाकरे

Rohan_P

आंबोली घाटात अज्ञात युवतीने घेतली उडी

Ganeshprasad Gogate

दीपिकाने दिली ड्रग्ज चॅटची कबुली; सारा, श्रद्धाची चौकशी सुरु

Rohan_P

जग्वार-सुखोई-हर्क्यूलसचे महामार्गावर लँडिंग

Amit Kulkarni

अतिक्रमण विरोधी कारवाईत आसाममध्ये 2 ठार

Amit Kulkarni
error: Content is protected !!