तरुण भारत

एलआयसीचे नव्या प्रीमियममधून उत्पन्न वाढले

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय जीवन विमा निगम(एलआयसी)ने 2019-20 मध्ये प्राप्त झालेल्या नवीन प्रीमियममुळे उत्पन्नात जवळपास 25.2 टक्क्मयांची वाढ नोंदवली असून 1,77,977 कोटी रुपयांवर हा आकडा पोहोचला असल्याची घोषणा केली आहे.

सदर कालावधीत कंपनीने 2,54,222.3 कोटी रुपये पॉलीसी पेमेंट केले असून यातून फक्त 1.31 टक्के इतकेच जादाचे पेमेंट झाल्याची माहिती आहे. सरकारी विमा कंपनीने दिलेल्या एका माहितीनुसार विमा क्षेत्रात 75.90 टक्के आणि पहिल्या वर्षातील प्रीमियममध्ये 68.74 टक्क्मयांच्या हिस्सेदारीच्या मदतीने एलआयसी बाजारातील अग्रणी कंपनी बनली आहे. यावेळीच पेंशन आणि सामूहीक सेवानिवृत्ती विभागातील व्यवसायाने नवा इतिहास नोंदवला आहे. या नवीन वर्गात प्रीमियम प्राप्तीमधून उत्पन्नाचा आकडा हा एक लाख कोटीच्या पुढे गेल्याचे म्हटले आहे.

मार्च 2020 मध्ये समाप्त झालेल्या वित्त वर्षाच्या दरम्यान एकूण विमा पेमेंट 2,54,222.27 कोटी रुपये झाले आहे. जे एक वर्षाच्या अगोदर 2,50,936.23 कोटी राहिले होते. याचदरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न 9.83 टक्क्मयांनी वधारुन 6,15,882.94 कोटींच्या घरात पोहोचले आहे.

विम्यासाठी ग्राहकांनी डिजिटल देवाणघेवाणीत 36 टक्क्मयांनी वृद्धी नोंदवलीय. मृत्यूशी संबंधीत 561 पॉलीसींच्या दाव्यामधून 26.74 कोटी रुपये ग्राहकांना दिले आहेत. 

Related Stories

भारताचा जीडीपी 6.5 टक्के राहणार

Patil_p

जिओमध्ये 730 कोटीची क्वालकॉम वेंचर्स गुंतवणूक करणार

Patil_p

तक्रारीनंतर ऍपलवर 11 कोटी डॉलर्सचा दंड

Patil_p

ट्रक्टर मागणीत तेजी राहणार

Patil_p

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ 17 मार्च रोजी

Patil_p

‘ऍपल’वाढविणार आयफोन-आयपॅडचे उत्पादन

Patil_p
error: Content is protected !!