तरुण भारत

पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती गीतादेवी पाटील यांचा राजीनामा

वारणानगर / प्रतिनिधी

पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती गीतादेवी पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.

पन्हाळा पंचायत समितीवर आ. विनय कोरे यांच्या पक्षाची सत्ता आहे. आ. कोरे यांनी गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांस पदावर काम करण्याची संधी मिळावी या अनुषंगाने हा निर्णय घेतला. पहिल्या अडीच वर्षे सभापतीपदासाठी खुल्या प्रवर्गातील आरक्षण पडल्याने पृथ्वीराज सरनोबत यांना संधी मिळाली. त्यांनी राजीनामा दिल्यावर मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन सुरू झालेवर नवीन पद निवडीस स्थगिती होती. या कार्यकाळात उपसभापती उज्वला पाटील यांना चार महिने सभापती म्हणून संधी मिळाली. त्यानंतर अनिल कंदूरकर यांना सभापती करण्यात आले.

पन्हाळा पंचायत समितीला दुसऱ्या टप्यातील अडीच वर्षासाठी महिला आरक्षण पडल्याने गीतादेवी पाटील कोडोली यांना संधी मिळाली. सात महिन्याचा कार्यकाळ पूर्ण करून त्यांनी आज राजीनामा दिला. तो अध्यक्ष बजरंग पाटील यानी मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविला आहे.

नव्या सभापतीच्या दावेदार तेजस्विनी शिंदे की वैशाली पाटील ?

माहिला आरक्षण पडल्यावर तीन महिला सदस्यांना आ. कोरे गटाकडून संधी मिळणार आहे. यातील पहिल्यांदा सभापती म्हणून गीतादेवी पाटील यांना संधी मिळाली. आता माले गणातील वैशाली पाटील व कोडोली पूर्व गणातील तेजस्विनी शिंदे यापैकी आमदार कोरे कोणाला संधी देतात हा औत्सुक्याचा विषय असणार आहे. शिंदे व पाटील यापैकी कोण बाजी मारणार हे निवडीदिवशी समजेल.

Related Stories

दूधगंगा नदी बचाव कृती समितीकडून नियोजित इंचलकरंजी पाणीपुरवठा योजनेस विरोध

Abhijeet Shinde

कसबा सांगाव गायरान जमीन विनापरवाना बांधकामावर कारवाईची मागणी

Sumit Tambekar

कोल्हापूर : वीजतारांच्या धक्क्याने सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू

Abhijeet Shinde

महिला पोलिसांच्या ड्युटीचे तास झाले कमी

datta jadhav

‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी राज्य सरकारची अवस्था : बावनकुळे

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात आणखी दोघे कोरोना बाधित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!