तरुण भारत

बाजार अंतिम दिवशी घसरणीसह बंद

रिलायन्स नुकसानीत तर स्टेट बँक तेजीत

वृत्तसंस्था / मुंबई 

Advertisements

जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतामुळे आणि सोबत रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यासारख्या कंपन्यांच्या समभागातील घसरणीच्या प्रभावामुळे चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स 129 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 129.18 अंकांनी घसरुन निर्देशांक 37,606.89 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 28.70 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,073.45 वर बंद झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोविडचे वाढते आकडे आणि जगभरातील विविध घडामोडींच्या प्रभावामुळे विदेशी बाजारांसोबत देशातील बाजार प्रभावीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक म्हणजे दोन टक्क्मयांनी घसरले आहेत. कंपनीने जून तिमाहीत 13,248 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. यामध्ये हिस्सेदारीमधील विक्रीने हा निक्वळ नफा कमाई केल्याची नोंद करण्यात आली आहे. एचडीएफसी बँक, एशियन पेन्टस, कोटक बँक, बजाज ऑटो आणि एचडीएफसीचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.

अन्य कंपन्यांमध्ये सन फार्मा, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एचसीएल टेक आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. तर स्टेट बँकेचे समभाग हे जवळपास तीन टक्क्मयांनी वधारले असून ही कामगिरी प्राप्त करण्यास स्टेट बँकेचा तिमाही नफा 81 टक्क्मयांनी वधारुन 4,189.34 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती शेअरबाजाराला देण्यात आली.

जागतिक संकेताच्या परिणामामुळे देशातील शेअर बाजारात चढउताराचे वातावरण राहिले होते. मागील तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था विक्रमी म्हणजे 32.9 टक्क्मयांनी घसरली आहे. हाँगकाँग, जपानचा निक्की, दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे बाजार नुकसानीत राहिले. तर चीनचा शांघाय हा मात्र तेजीत राहिला आहे.

Related Stories

शेअर बाजारात घसरण कायम

Patil_p

मोटोरोलाचा रेजर 5 जी, 48एमपी कॅमेऱयासोबत दाखल

Patil_p

मार्चपर्यंत भारत पेट्रोलियमचे खासगीकरण

Patil_p

रेमण्डकडून रियल इस्टेट व्यवसायासाठी नवी कंपनी

Patil_p

शेअर बाजार किंचित वाढीसह बंद

Patil_p

मॅक्स वेंचर्स बांधकाम क्षेत्रात?

Patil_p
error: Content is protected !!