तरुण भारत

हैदराबाद विमानतळावर 11 प्रवाशांकडून जप्त केले 1.66 कोटींचे सोने

ऑनलाईन टीम / हैदराबाद :


हैदराबाद मधून आंतर राष्ट्रीय विमानतळावरील 11 प्रवाशांकडून तस्करी करुन आणलेले जवळपास 3.11 किलो ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत 1.66 कोटी इतकी आहे.

Advertisements

 
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रवासी वंदे भारत मिशनच्या विमानातून सौदी अरेबियामधील दम्मान येथून आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांनी आपल्या ट्राउजरच्या खिशात सोने लपवून ठेवले होते. संशय आणि प्रवाशांच्या प्रोफाईलच्या आधारे 11 प्रवाशांच्या विरुद्ध सोन्याची तस्करी केल्याचा गुन्हा दखल केला आहे. या प्रवाशांची चौकशी सुरू आहे. 


अशाच आणखी एका घटनेत सीमाशुल्क विभागाने सीआयएसएफबरोबर समन्वय करत 5 अशा प्रवाशांचा शोध घेतला, जे चंदनाची तस्करी करण्याचा विचार करत होते. त्यांच्याकडून 78.5 किलो ग्राम चंदनाची लाकड जप्त केली. हे पाचही प्रवासी हैदराबाद ते खर्तूम असा प्रवास करणार होते. सीमाशुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

शाहू गव्हर्मेंट बँकेवर पुन्हा सत्तारूढ गटाचा झेंडा, १४ जागांवर विजय

Abhijeet Shinde

आयएएस अधिकारी विजयशंकर यांची आत्महत्या

Patil_p

भारत-पाक सीमेवर उस्मानाबादचा तरुण अटकेत

datta jadhav

विदेशी चलन भांडार 541.66 अब्ज डॉलर्सवर

Patil_p

अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात पुण्यात तक्रार; कारवाईची मागणी

datta jadhav

जम्मू काश्मीर : भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र रैना यांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!