तरुण भारत

सातारा : जिल्हय़ात उच्चांकी २२८ बाधित

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्हय़ात कोरोनाबाधितांच्या रोज येणार्‍या आकडय़ांनी जिल्हावासियांना धडकी भरत आहे. आकडे वाढत असले तरी कोरोनामुक्तीनेही वेग घेतला आहे. शुक्रवारी 54 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्तीने 2 हजाराचा टप्पा ओलांडला असून 2 हजार 36 इतका एकुण आकडा झाला आहे. शुक्रवारी खासगी प्रयोगशाळांमधील तपासणीत शुक्रवारी 25 जण बाधित असल्याचे अहवाल आले आहेत. शुक्रवारी रात्रीच्या अहवाल 203 बाधित आले असून दिवसभरात उच्चांकी 228 बाधित झाले आहेत. एकूण रुग्ण संख्येने 4 हजाराचा टप्पा गाठला आहे. कराड शहरात रुग्ण संख्या शंभरावर गेली आहे.

Advertisements

व्यापारी वर्गात समाधान
जिल्हय़ातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा आज संपला असून उद्यापासून जिल्हा पुन्हा सुरू होणार आहे. व्यापारी वर्गाच्या मागणीनुसार पूर्णवेळ दुकाने उघडण्यास संमती देण्यात आली. त्यामुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. पन्नास टक्के क्षमतेने बस वाहतूकही सुरू होणार आहे. कोरोनाने थैमान घातले असताना जिल्हा सुरू होत असल्याने अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या बाधित होण्याचे प्रमाण पाहता सावधानता बाळगणे गरजेचे आहे. प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे.

54 नागरिकांना दिला डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 54 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये
महाबळेश्वर तालुक्यातील बेल एअर हॉस्पीटल येथील 28 वर्षीय पुरुष, भिलार येथील 38 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 34 वर्षीय पुरुष व 6 वर्षीय मुलगा व 8 वर्षीय मुलगी.
सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथील 55 वर्षीय पुरुष, कामेरी येथील 51 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, गोजेगाव येथील 27, 23, 55 वर्षीय पुरुष व 2 वर्षीय मुलगी, कण्हेर येथील 18, 40 वर्षीय पुरुष व 24, 20,27, 65 वर्षीय महिला व 1 वर्षीय बालिका, शेळकेवाडी सातारा येथील 47 वर्षीय पुरुष, सातारा शहरातील बुधवार पेठेतील 16, 53, 49 वर्षीय पुरुष, जिहे येथील 34 वर्षीय पुरुष.
कराड तालुक्यातील सुपने येथील 28 वर्षीय पुरुष, आटके येथील 34 वर्षीय पुरुष, नेरले येथील 15 वर्षीय मुलगी, कालवडे येथील 67,60 ,40 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 18, 30, 27 वर्षीय पुरुष, कराड बुधवार पेठेतील 30 वर्षीय महिला, कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 34 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर कार्वे नाका येथील 50 वर्षीय महिला.
जावली तालुक्यातील मेढा येथील 31 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगा, रायगाव येथील 22, 24, 31, 34, 35 वर्षीय पुरुष व 25, 45, 21, 25 वर्षीय महिला, मोरघर येथील 30 वर्षीय महिला.
पाटण तालुक्यातील नारळवाडी येथील 29 वर्षीय महिला.,
खटाव तालुक्यातील वडूज येथील 69 वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यातील बावधन येथील 59 वर्षीय महिला, शेंदुरजणे येथील 80 वर्षीय महिला व 14 वर्षीय युवक.
माण तालुक्यातील आंधळी येथील 60 वर्षीय पुरुष यांना डिस्चार्ज देण्यात आला.

खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 25 रुग्ण कोरोनाबाधित
25 मे ते 26 जुलै या दरम्यान जिह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 25 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे कळविण्यात आले आहे.
सातारा तालुका- 16 (सातारा शहर 7), जावळी तालुका-2, वाई तालुका-1, माण तालुका-1, पाटण तालुका-1, खटाव तालुका-1, खंडाळा तालुका-1, इचलकरंजी (कोल्हापूर)-1, कडेगाव (सांगली)-1 याप्रमाणे बाधित रूग्ण आहेत.

524 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 37, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 104, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 33, कोरेगाव येथील 2, वाई येथील 44, शिरवळ येथील 52, रायगाव 14, पानमळेवाडी 15, मायणी 54, महाबळेश्वर 27, पाटण 58, दहिवडी 23, खावली येथे 13 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 79 असे एकुण 555 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

दुदुस्करवाडीतील सर्वांची होणार ऍन्टिजन टेस्ट
जावली तालुक्यातील रामवाडी, पुनवडी, सायगावनंतर दुदुस्करवाडी हॉटस्पॉट झाली आहे. युवकाचा वाढदिवस साजरा करणे गावाला भोवले असून आतापर्यंत 57 जण बाधित सापडले आहेत. त्यामुळे सुमारे 545 लोकवस्तीच्या या गावातील सर्वांची टेस्ट होणार आहे. गुरुवारी रात्री 17 पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर शुक्रवारी गावातच शिबिर घेऊन 124 जणांची ऍन्टीजन टेस्ट घेतली. त्यात 21 बाधित सापडले आहेत. आजपर्यंत 234 जणांची टेस्ट घेण्यात आली आहे. त्यातील एकुण 57 बाधित सापडले आहेत. गावातील उर्वरित सर्वांची ऍन्टीजन टेस्ट घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 163 जणांचे अहवाल बाधित
जिल्ह्यात गुरुवारी रात्री 163 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
पाटण 4 तालुक्यातील त्रिपोडी येथील 25 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 25 वर्षीय महिला, मल्हारपेठ येथील 28 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय महिला.
वाई 9 तालुक्यातील बोरगाव येथील 17 वर्षीय युवक, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, यशवंतनगर येथील 28 वर्षीय महिला, बोपेगाव येथील 18 वर्षीय युवती, परखंदी येथील 73 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय पुरुष, मुंगसेवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष.
कराड 50 तालुक्यातील शामगाव येथील 76, 44 वर्षीय महिला 13 वर्षीय मुलगी, कालवडे येथील 14, 12, 13 वर्षीय युवक, 45 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 38 वर्षीय महिला व 20 वर्षीय पुरुष, घराळवाडी येथील 59 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 63 वर्षीय पुरुष 60, 34 वर्षीय महिला, 7, 9 वर्षीय बालिका, शिवडे येथील 25, 63 वर्षीय पुरुष, कराड येथील 28 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 65, 58 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष व 65, 37 वर्षीय महिला व 14, 17 वर्षीय बालक, आगाशिवनगर येथील 36, 40, 65 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय बालक, 19 वर्षीय तरुण, 17 वर्षीय युवती, गजानन सोसायटीतील 78 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 37 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल येथील 25 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 20, 50, 37, 37 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष, 18, 12 वर्षीय युवक व 15 वर्षीय युवती, मलकापूर येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 60 वर्षीय महिला, रेठरे बुद्रुक येथील 34 वर्षीय पुरुष, सह्याद्री हॉस्पिटल येथील 16 वर्षीय युवती, 46, 35 वर्षीय महिला.
खंडाळा 13 तालुक्यातील बावडा येथील 89 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, पंढरपूर फाटा येथील 26 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, विंग येथील 45 वर्षीय पुरुष व 74 वर्षीय महिला, खंडाळा येथील 30, 33 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, पाडेगाव येथील 20 वर्षीय पुरुष, राजेवाडी येथील 75 वर्षीय महिला, मंडई कॉलनी शिरवळ येथील 19 वर्षीय महिला, मोरवे येथील 67 वर्षीय पुरुष.
सातारा 15 तालुक्यातील भवानी पेठ येथील 28, 21 वर्षीय पुरुष, गडकर आळी येथील 3, 12 वर्षीय बालक, 23, 38 वर्षीय महिला व 44 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 57 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ येथील 62 वर्षीय पुरुष, अतित येथील 49 वर्षीय पुरुष, औंध येथील 70 वर्षीय महिला, गोडोली येथील 39 वर्षीय महिला, शिवथर येथील 61 वर्षीय पुरुष, शाहुपुरी येथील 63 वर्षीय पुरुष, सदर बझार येथील 23 वर्षीय महिला.
माण4 तालुक्यातील दहिवडी येथील 33, 35 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, शिंगणापूर येथील 69 वर्षीय पुरुष.
कोरेगाव 12 तालुक्यातील वाठार स्टेशन येथील 36 वर्षीय पुरुष, पिंपोडे येथील 36 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, वाघोली येथील 35 वर्षीय महिला व 55, 60, 74 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 50 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, रहिमतपूर येथील 24 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 70 वर्षीय महिला.
खटाव 5 तालुक्यातील खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडुज येथील 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, मायणी येथील 39, 31 वर्षीय पुरुष.
फलटण 17 तालुक्यातील जिंती नाका येथील 18 वर्षीय युवक, 33, 74 वर्षीय महिला, लक्ष्मीनगर येथील 57 वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील 45, 20, 39 वर्षीय पुरुष, 17, 14, 13 वर्षीय युवती व 35 वर्षीय महिला व 4 वर्षाची बालिका, रविवार पेठ येथील 27 वर्षीय महिला, सासवड येथील 70, 64 वर्षीय पुरुष, पाडेगाव येथील 38 वर्षीय पुरुष, उपळे येथील 53 वर्षीय पुरुष.

महाबळेश्वर 19 तालुक्यातील रांजणवाडी येथील 11, 9, 7 वर्षीय बालिका 70, 23 वर्षीय महिला, 58, 23, 38, 51, 60, 55 वर्षीय पुरुष, गोडवली येथील 31, 70, 23 वर्षीय महिला, मल्होत्राभवन भोसे खिंड येथील 30 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालिका, पाचगणी येथील 24 वर्षीय पुरुष व 22 व 48 वर्षीय महिला.

जावली 18 तालुक्यातील दुदुस्करवाडी 55, 60, 25, 31 ,45, 60 वर्षीय महिला, 75, 40, 35, 30, 29, 53, 57, 91 वर्षीय पुरुष व 10, 8 वर्षाचा बालक व 6 वर्षाची बालिका, सायगाव येथील 54 वर्षीय पुरुष.

जिल्हय़ात शुक्रवारपर्यंत
घेतलेले एकूण नमुने 28425
एकूण बाधित 4052
घरी सोडण्यात आलेले 2036
मृत्यू 130
उपचारार्थ रुग्ण 1886

जिल्हय़ात शुक्रवारी
बाधित 228
मुक्त 54
मृत्यू 00

Related Stories

प्रजासत्ताक दिनी साताऱ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Shankar_P

सातारा : गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून नियमावली जारी

Shankar_P

सातारा : गुरव कुटुंबियाच्या मदतीसाठी पंचायत समितीचे सदस्य सरसावले

datta jadhav

सातारा : ‘महिला’ ही गुन्हेगारीत आघाडीवर

triratna

गणेश मंडळाकडून मूर्तीचे बुकिंगच नाही

Patil_p

अंनिसची फसवे विज्ञान विरोधी ऑनलाईन व्याख्यानमाला

triratna
error: Content is protected !!