तरुण भारत

1.20 नव्हे, 2.70 कोटीची अफरातफर

आयसीआयसीआयच्या संशयित गुल्शन गुसाईला पोलीस कोठडीत ठेऊन चौकशी करणे उचित : सत्र न्यायालयाने अनेक सुनावणीनंतर दिलेला आदेश

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

आयसीआयसीआय बँकच्या आर्लेम शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक तथा संशयित आरोपी गुल्शन गुसाई याने एकूण 2,70,00,000 रुपयांची अफरातफर केलेली असल्याचे न्यायालयाला सकृत दर्शनी दिसून आल्याने मूळ औंध, पुणे येथील या संशयित आरोपीला पोलीस कोठडीत ठेऊनच त्याची चौकशी करणे उचित असल्याचे म्हटले आहे.

 ए-23, तोरणा हावसिंग सासायटी, भाऊ पाटील रोड, औंध, पुणे येथे राहणारा 33 वर्षीय संशयित आरोपी गुल्शन गुसाई हा आयसीआयसीआय बँकेच्या आर्लेम शाखा व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना मडगाव परिसरात राहणारे साईनाथ  पै काणे यांना 1.20 कोटी रुपयांना गंडा घातल्याच्या आरोपीवरुन हे प्रकरण सर्वप्रथम पोलिसांपर्यंत गेले होते.

हा घोटाळा नंतर उजेडात आला तेव्हा आणखी काही पीडित एकत्र आले व या संशयिताविरुद्ध न्यायालयात धाव घेऊन त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला. हा विरोध करताना या पीडितांनी आपल्यालाही या संशयित आरोपीने कशा पद्धतीने गंडा घातला हे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले.

या अर्जासंबंधी न्यायालयात अनेक सुनावण्या झाल्या. अनेक वकिलांनी या संशयिताविरुद्ध अनेक सकृत दर्शनी पुरावे सादर केले. एकंदर प्रकरणांचा आढावा घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एडगर फर्नाडिस यांनी शुक्रवारी 18 पानी निकाल दिला.

अर्जदार गुल्सन गुसाई याने केलेल्या मोठय़ा प्रमाणातील ‘व्यवहार’ पाहता या अर्जदाराची कोठडीत ठेऊन चौकशी करणे गरजेचे आहे असे आपल्याला वाटत आहे असे न्या. एडगर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

  अर्जदार तथा संशयित आरोपी गुल्शन गुसाई याच्यावतीने राजीव गोम्स यांनी तर सरकारपक्षातर्फे डी. कोरगावकर, साईनाथ पै काणे यांच्यावतीने ऍड. मांगिरीश आंगले तर दुसऱया एका पीडितेच्यावतीने ऍड. अवधूत आर्सेकर तर आयसीआयसीआय बँकेच्यावतीने ऍड. एस. रोड्रिग्स यांनी न्यायालयात काम पाहिले.

संशयित आारोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 403 (मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करणे), 406 ( मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार केल्याप्रकरणी शिक्षा होणे), 409 (बँक व्यवसायिकाने केलेला फौजदारीपात्र गुन्हा), 418 (ज्या व्यक्तीचे हित जपण्याची जबाबदारी आहे त्या व्यक्तीला हानी पोहोचेल याची जाणीव असणे), 420 (जाणीवपूर्वक फसवणूक करणे), 468 (फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवाबनवी करणे), 471 (कागदपत्रे बनावट आहेत याची कल्पना असून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून प्राधिकरणाकडे सादर करणे) या सारख्या कलमाखाली गुन्हा नोंद केलेला आहेत.

Related Stories

पेडणे बाजारपेठेत दुकानात ट्रक घुसून नुकसान

Amit Kulkarni

श्रीपाद नाईक मणिपाल इस्पितळात

Patil_p

उड्डाणपुलाच्या मागणीसाठी कामरखाजन येथे नागरिक उतरले रस्त्यावर

Patil_p

वास्कोत वाऱया पावसामुळे पडझड, घरांमध्येही शिरले पाणी

Omkar B

आठ दिवसात तिसरे कोविड हॉस्पिटल कार्यरत होणार : आरोग्यमंत्री

Patil_p

गोव्यातील मित्रांनीच केले अंत्यसंस्कार

Patil_p
error: Content is protected !!