तरुण भारत

शैक्षणिक संस्थांबाबत राज्याचे अद्याप निर्देश नाही

घरूनच काम करण्याची मुदत संपुष्ठात : शिक्षण संस्था, शिक्षक संभ्रमात

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची मुदत काल 31 जुलै रोजी संपुष्ठात आली असून पुढे काय करायचे याबाबत निर्देश देण्यास राज्यातील शिक्षण खाते विसरले आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गाने 31 जुलैपर्यंत घरून ऑनलाईन काम करावे, असे निर्देश शिक्षण खात्याने यापूर्वी दिले होते. तथापि, ती मुदत संपली असून आता शाळेत यायचे की घरूनच काम करायचे याबाबत राज्य शिक्षण खात्याने कोणाताही खुलासा केलेला नाही. परिणामी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱयांपुढे शाळेत यायचे की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मागील आठवडय़ात राज्य शिक्षण खात्याने परिपत्रक काढून शिक्षण संस्था 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱयांना घरून ऑनलाईन पद्धतीने काम करण्याचे निर्देश दिले होते. तथापि, काही शिक्षकांना व इतर कर्मचाऱयांना विविध कामांसाठी शाळेत जावेच लागते. आज शनिवारी आणि उद्या रविवारी सुट्टी आल्याने सोमवारी दि. 3 ऑगष्टपासून शाळेत जावे की नाही? याबाबत राज्य शिक्षण खात्याने काहीही निर्देश दिलेले नाहीत. घरी राहून ऑनलाईन पद्धतीने काम करण्यास अनुमती द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, केंद्र सरकारने शाळा, शैक्षणिक संस्था 31 ऑगष्टपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Stories

म्हापसा विठ्ठल रखुमाई मंदिरात 15 रोजी महाएकादशी

Amit Kulkarni

सरकारने परवानगी नाकारली तरी 31 मार्च रोजी शिवजयंती दिनी

Amit Kulkarni

मेळावलीवासीयांचे ऐका, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका: राहुल म्हांबरे

Omkar B

मडगावातून दोन मुलींचे अपहरण फातोर्डा येथील संशयिताच्या मागावर पोलीस

Amit Kulkarni

संसारच वाहून गेला.. कागदपत्रे शोधणार कुठे !

Amit Kulkarni

सुभाष वेलिंगकर यांचा राजकारणातून सन्यास

Patil_p
error: Content is protected !!