तरुण भारत

हातकणंगले: पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल

हातकणंगले /बाबुराव जाधव

गेल्या आठ ते दहा दिवसापासून पावसाने तालुक्यात हजरी न लावल्याने जोमात आलेले खरीप हंगामातील पिके आता आपल्या माना टाकताना दिसत आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठा तालुका म्हणून हातकणंगले तालुक्याकडे पाहिले जाते. हातकणंगले तालुक्याचे क्षेत्रफळ जवळपास 5900 चौरस किलोमीटर असून या तालुक्यात शेतकरी जवळपास सर्वच पिकांची लागवड करत असतो, यामध्ये तृणधान्य, तेलबिया, कडधान्य, ऊस इत्यादी पिके घेतली जातात. या तालुक्याला उत्तरेस वारणा नदी तर दक्षिणेस पंचगंगा नद्या लाभल्या आहेत, त्यामुळे बागायत क्षेत्र ही बऱ्यापैकी आहे. चालू खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र जवळपास 1O,691 हेक्‍टर इतके असून त्याखालोखाल भुईमूग क्षेत्र 8735 हेक्टर आहे. ही दोन पिके प्रामुख्याने बागायत व जिरायत क्षेत्रात घेतली जातात. मात्र बागायत क्षेत्र वगळता बहुतांश जिरायत शेतीमध्ये हे पीक अधिक प्रमाणात आढळते. यातच पावसाने ओढ दिल्याने जिरायत हलक्‍या प्रति च्या जमीनीत या पिकांनी आपल्या मनात टाकण्यास सुरुवात केली आहे.

चांगल्या प्रतीचा रानामध्ये अजून तरी ही पिके तग लावून आहेत. मात्र आणखी काही दिवस जर का पावसाने ओढ दिली तर मात्र हे पीक होरपळण्याच्या मार्गावर आहे. तसेच यंदा या वर्षी मागील वर्षापेक्षा 12 टक्क्याने ऊस क्षेत्रात वाढ झाली असून परिपक्व असलेला ऊस 22,165 ट्रॅक्टर आहे, तर नवीन लागनी 3861 हेक्‍टरवर करण्यात आली आहे. हे पीक ही नदी शेत्र सोडले तर अनेक ठिकाणी कूपनलिका ,विहिरी वर अवलंबून असते चालू वर्षी जर का पावूस जेमतेम झाला तर विहिरी कूपनलिकांचे पाणी कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला शासनाने चालू वर्षी ही मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात याच्या उलट झाले असून हातकणंगले तालुक्यात गेले दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे आता जोमात आलेली पिके पावसाअभावी होरपळण्याच्या मार्गावर आहेत.

हातकणंगले तालुक्यात घेण्यात येणाऱ्या पिकांची आकडेवारी हेक्टर मध्ये

तृणधान्य 1584 यात ज्वारी 850 मका 52 व इतर

कडधान्य 2350 यात तुर 73, मुग 403, उडीद 290 व इतर

तेलबिया 19 हजार 426 यात भुईमूग 8735, सोयाबीन 10691 व इतर

ऊस 2019 -20 साठी22165

नवीन लागण 3161

व इतर भाजीपाला 312

Related Stories

‘या’ गोष्टींमुळे कासारपुतळेने केली कोरोनामुक्त गावाकडे वाटचाल

Abhijeet Shinde

वाईतील पाणी पुरवठा योजनेसाठी 35 कोटी

Patil_p

‘सीपीआर’मध्ये कोरोना संशयिताचा मृत्यू

Abhijeet Shinde

सातारा : काही दिवसापूर्वीच ‘ते’ झाले क्वारंटाइन, चोरट्यांच्या तिजोरीवर डल्ला

Abhijeet Shinde

जम्बो हॉस्पिटल समोरील अतिक्रमणे हटवली

Patil_p

गोकुळ शिरगाव येथे एकाची आत्महत्या

Sumit Tambekar
error: Content is protected !!