तरुण भारत

झारखंडमध्ये 31 ऑगस्टपर्यंत वाढवले लॉक डाऊन

ऑनलाईन टीम / रांची : 


देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. झारखंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने झारखंड सरकारने 31 ऑगस्टपर्यंत लॉक डाऊन वाढवत असल्याची घोषणा केली आहे.


राज्यात हे लॉक डाऊन आज पासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून सुरु झाले आहे. त्यासोबतच आज पासून राज्यात 3 दिवस कोरोना तपासणीचा वेग वाढवला जाणार आहे.  

दरम्यान, झारखंड सरकारने जवळपास 1 लाख लोकांची टेस्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या तपासणीद्वारे सरकार कोरोना संसर्ग दराचे आढावा घेणार आहे.  
पूर्वीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, मॉल्स, सलून, स्पा, हॉटेल, रेस्टॉरंट्स, धर्मशाळा, बार, आंतरराज्यीय बससेवा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, जिम, कोचिंग यासह मंदिर, मशिदी, चर्च, संस्थादेखील बंदच राहतील. तर सद्य स्थितीत राज्यात कोरोना बाधितांची संख्या 10 हजारच्या पुढे गेली आहे. 

Related Stories

हाउसबोटचा आयसोलेशनसाठी वापर

Patil_p

केंद्र शासित प्रदेशात एसएमएस सेवेस प्रारंभ

Patil_p

दिल्लीतील हिंसाचारात आप-काँग्रेसचा हात

Patil_p

मुझफ्फरपूर : 11 रोजी शिक्षेची घोषणा

Patil_p

या महिन्यात गरिबांना दुप्पट धान्य मोफत देणार दिल्ली सरकार

pradnya p

जम्मू – काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 992 वर

pradnya p