तरुण भारत

आंध्र प्रदेश : विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये कोसळली क्रेन; 11 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / विशाखापट्टणम : 


आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मध्ये शनिवारी एक मोठा अपघात झाला. येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये एक क्रेन कोसळली. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद यांनी दिली. 


मिळालेल्या माहितीनुसार, डी सी पी सुरेश बाबू यांनी सांगितले होते की, क्रेन कोसळल्याने या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. 


दरम्यान, हा अपघात झाला त्यावेळी या क्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. काही अधिकारी आणि ऑपरेटर क्रेन ची पाहणी करत होते. यावेळी क्रेनवर साधारण 30 लोकं होती. यामध्ये जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत सहा मृतदेह या क्रेनखालून बाहेर काढण्यात यश आले आहे.


आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले की, मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी यांनी  विशाखापट्टणम चे जिल्हा कलेक्टर आणि शहराच्या पोलीस आयुक्तांना क्रेन दुर्घटना घटनेची दखल घेत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

Related Stories

ट्रम्प यांच्यावरील ‘त्या’ वादग्रस्त पुस्तकाचा पहिल्याच दिवशी विक्रमी खप

datta jadhav

राज्यातील रुग्णसंख्या पोहोचली 9 हजारावर

Patil_p

कोल्हापूर : ‘त्या’ डॉक्टरसह रिसेप्शनिस्टही कोरोना पॉझिटिव्ह

triratna

अयोध्येतील पूर्वतयारीचा योगींनी घेतला आढावा

Patil_p

ऑस्ट्रेलियाचे माजी टेनिसपटू कूपर कालवश

Patil_p

एक लस दुसऱया टप्प्यात : दुसरी 99 टक्के प्रभावी

Patil_p