तरुण भारत

ऑस्ट्रेलियात गूगल, फेसबुकला बातम्यांसाठी मोजावे लागणार पैसे

ऑनलाईन टीम / कॅनबेरा : 

ऑस्ट्रेलियामध्ये गूगल आणि फेसबुकला बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. कोरोनामुळे प्रसार माध्यमे आर्थिक संकटात आल्याने ऑस्ट्रेलिया सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Advertisements

ऑस्ट्रेलियन सरकारने आचारसंहिता (MANDATORY CODE) अनिवार्य केली असून, याचा मसुदा जाहीर केला. त्यामुळे डिजिटल कंपन्यांना व्यावसायिक मीडिया कंपन्यांकडून घेतल्या गेलेल्या बातम्यांकरिता पैसे द्यावे लागतील.

बातमीच्या आशयासाठी सरकार शुल्क आकारत आहे. गूगल आणि फेसबुकला मीडिया कंपन्यांशी बोलण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या देयकासंदर्भात शासनाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. या आठवड्यात संसदेत गूगल आणि फेसबुकवरील बातम्यांकरिता पैसे देण्याबाबतचा कायदा सादर करण्यात येईल. 

ऑस्ट्रेलियाने पेड न्यूजसाठी कायदा केल्यास आम्ही ऑस्ट्रेलियाच्या बातम्या डिजिटल व्यासपीठावर प्रकाशित करणार नाही, असे गूगलने म्हटले आहे. 

Related Stories

”काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा खतरनाक”

Abhijeet Shinde

सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य पण… : राज ठाकरे

Rohan_P

देशात कोरोना फैलाव थांबेना; गेल्या २४ तासांत २२,७७५ नवे कोरोना रुग्ण

Sumit Tambekar

जयपूरमध्ये होणार जगातले तिसरे मोठे क्रिकेटचे मैदान

datta jadhav

महिनाभरात 108 देशात ओमिक्रॉनचे दीड लाख रुग्ण

datta jadhav

एसबीआयकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

datta jadhav
error: Content is protected !!